विज्ञानाचे महत्व nebandha
Answers
Answer:
Hope it's helpful to you
Explanation:
एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने (systematic study) केलेल्या अभ्यासास विज्ञान असे म्हणतात. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय. लॅटिन भाषेतील Scientia (सायन्शिया) या शब्दावरून इंग्रजीतील ‘सायन्स’ हा शब्द तयार झालेला आहे.
विज्ञानात ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. तथापि, सर्वच प्रकारच्या ज्ञानाला विज्ञान म्हटले जात नाही - उदा. अध्यात्म.
वस्तुस्थितीच्या घटकांचे वर्गीकरण व विश्लेषण करणे, त्यांतील परस्परसंबंधांचे सार्वत्रिक नियम शोधणे, अशा नियमांच्या साहाय्याने अमुक घटना निश्चित अमुक वेळी होणारच असे वर्तविणे, या अज्ञानापासून मानवी जीवनाच्या साफल्यासाठी उपयोगी ठरेल अशी तंत्रविद्या निर्माण करणे इत्यादी विज्ञानाची कार्ये समजण्यात येतात..[२]
विज्ञानाचे सर्वात प्रमुख कार्य म्हणजे सृष्टीतील संगती जानणे, तिचे रहस्य उलगडणे हे होय. वस्तुस्थितीतील सुटयासुटया घटकांची माहिती होणे याला फारसे महत्त्व नाही; महत्त्व आहे ते या घटकांतील परस्परसंबंधांविषयीचे नियम सापडण्याला. असे नियम सापडणे म्हणजे सृष्टीतील घटकांचा व घटनांचा अर्थ लावणे होय. कोणतीही घटना समजणे म्हणजे ती कोणत्या सृष्टिनियमानुसार होते हे कळणे. काय केले असता काय होईल हे कळले म्हणजे विज्ञानाचे कार्य संपले असे नाही. विज्ञानाचा रोख जे घडते ते कोणत्या सृष्टिनियमानुसार घडते व कसे घडते हे शोधून काढण्यावर असतो. सृष्टीचे रहस्य जाणणे हे विज्ञानाचे ध्येय असते.
विज्ञान हे प्रयोगातून सिद्ध करून दाखविते. विज्ञान हा प्रगतीचा स्रोत आहे.