History, asked by shubhangisaindane5, 1 month ago

विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला​

Answers

Answered by ashishdholi2005
10

भारताच्या मंगलयान अंतराळ मोहिमेच्या वेळेस आणि मागच्याच आठवड्यामध्ये एकाचवेळेस १०४ उपग्रह पाठविण्याच्या वेळेस इस्रोमधील महिला वैज्ञानिकांचे एक छायाचित्र विशेष प्रसिद्ध झाले.

१)डॉ. आनंदीबाई जोशी (१८६५-१८८७)

पहिल्या महिला भारतीय डॉक्टर म्हणून नाव घेतले जाते ते आनंदीबाई जोशी यांचे. अत्यंत कर्मठ समाजामध्ये जगताना एखाद्या महिलेने तेही विवाहित महिलेने परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणे कोणाच्या कल्पनेतही आले नसते. पण आनंदीबार्इंचे पती गोपाळराव जोशी यांच्या आग्रहामुळे आनंदीबाईंनी सुरुवातीचे शिक्षण भारतात घेतले आणि नंतर त्या वूमन्स मेडिकल कॉलेज आॅफ पेनसिल्वानियाला गेल्या. शिक्षण घेतल्यानंतर त्या पुन्हा भारतात आल्या आणि काही काळ कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी नोकरीही केली. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. चौदाव्या वर्षी त्यांनी एका मुलास जन्मही दिला पण ते मूल फार जगू शकले नाही. आनंदीबार्इंची स्वत:ची तब्येतही विविध आजारांमुळे तोळामासा झाली होती. त्यातच त्यांचा अंत झाला. १८८७ साली त्यांचे निधन झाले. परंतु आनंदीबाईंनी भारतीय वैद्यकशाखेमध्ये महिलांनाही प्रवेश मिळवून दिला.

२) जानकी अम्मल (१८९७-१९८४)

मुलींचं काम म्हणजे भरतकाम, विणकाम, शिवणकाम आणि स्वयंपाक. त्यांनी कशाला शिकायला हवं. शिकायचंच आहे तर फारतर कला शाखेची बुकं शिका आणि लवकर लग्न करुन संसाराला लागा अशी मुलींच्या शिक्षणाबद्दल भारतात कल्पना होती. सर्व मुली कला शाखेकडे वळत असताना जानकी अम्मल यांनी मात्र विज्ञानशाखेचा अभ्यास करायचे ठरवले. त्यांनी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास सुरु केला. कायटोजेनेटिक्स आणि फायटोजिआॅग्रफीमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले आणि संशोधनासाठी त्या इंग्लंडला गेल्या. १९५१मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी बोटॅनिकल सर्व्हे आॅफ इंडियामध्ये नोकरी सुरु केली आणि त्या त्याच्या डायरेक्टर जनरलही झाल्या. वनस्पतींच्या औषधमुल्याबाबतही त्यांनी विशेष संशोधन केले.

३) कमला सोहोनी (१९१२-१९९८)

कमला सोहोनी या विज्ञान शाखेतील पी.एचडी मिळवणाºया पहिल्या भारतीय महिला आहेत. आयआयएससीसाठी त्यांनी शोधवृत्तीसाठी अर्ज केला असता केवळ महिला आहे म्हणून त्यांना नकार मिळाला होता. मात्र सी. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन सुरु केले. केंब्रिजमध्ये असताना त्यांनी वनस्पतीच्या प्रत्येक पेशीमध्ये सायटोक्रोम-सी हे किण्वक (एन्झाइम) असल्याचे त्यांनी शोधून काढले , या एन्झाइमचा समावेश आॅक्सीडेशनमध्ये होत असतो हे देखिल त्यांच्या लक्षात आले. त्यांची पी.एचडी याच विषयावर होती. त्यांनी नेहमीच गरीब व्यक्तींच्या आहारातील पदार्थांबाबत संशोधन केले. नीरा या पेयाचे पोषणमुल्य पटवून देणाºया आद्य व्यक्तींमध्ये कमला सोहोनी यांचे नाव घेतले जाते.

४) अन्ना मणि (१९१८-२००१)

अन्ना मणि यांचे नाव हवामानशास्त्राच्या संशोधनामध्ये प्रामुख्याने घेतले जाते. भारतीस हवामानशास्त्र विभागामध्ये त्या डेप्युटी जनरल पदावरती कार्यरत होत्या.

५) असिमा चॅटर्जी (१९१७-२००६)

असिमा चॅटर्जी या नावाजलेल्या रसायनशास्त्रज्ञा होत्या. त्यांचा संशोधनाचे विषय आॅरगॅनिक केमेस्ट्री आणि फायटोकेमेस्ट्री हे होते. विन्स अल्कलॉइड वरती त्यांनी संधोधन केले तसेच अँटी एपिलेप्टीक औषधांच्या विकासासाठी त्यांनी अमूल्य योगदान दिले. भारती़य उपखंडातील औषधी वनास्पतींवर त्यांनी ग्रंथही लिहिले आहेत.

६)राजेश्वरी चॅटर्जी (१९२२-२०१०)

राजेश्वरी चॅटर्जी या कर्नाटकमधील पहिल्या महिला अभियंत्या होत्या. १९४६ साली त्यांना तत्कालीन दिल्ली सरकारने भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्या पदव्युत्तर शिक्षणासाठी मिशिगन विद्यापीठाच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात हजर झाल्या. तेथे पी.एचडी पदवी मिळवल्यानंतर त्या भारतात आयआयएससीच्या डिपार्टमेंट आॅफ इलेक्ट्रीकल कम्युनिकेशन विभागात रुजू झाल्या. मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंगमधील आद्य संशोधनाचे काम चॅटर्जी यांनी आपल्या पतीसमवेत येथे केले.

७) दर्शन रंगनाथन (१९४१-२००१)

दर्शन या आॅरगॅनिक केमिस्ट म्हणून नावाजलेल्या वैज्ञानिक होत्या. त्यांनी प्रोटीन फोल्डींग आणि सुपरमोलेक्युअल असेंम्ब्लीजमध्ये विशेष योगदान दिले. १९९८साली त्यांनी आयआयसीटी हैदराबादमध्ये सेवा सुरु केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दर्शन रंगनाथन द्वैवार्षिक व्याख्यानाची व पुरस्काराची सुरुवात त्यांच्या पतीने केली आहे.

८) महाराणी चक्रवर्ती (१९३७)

महाराणी यांची ओळख मोलेक्युलर बॉयोलॉजिस्ट म्हणून आहे. अमेरिकेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोलकात्या बोस संस्थेमध्ये संशोधन सुरु केले. त्यांचा दर्शन रंगनाथन पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे.

९)चारुसीता चक्रवर्ती (१९६५)

अमेरिकेत जन्मलेल्या चारुसीता यांनी अमेरिकन नागरिकत्व सोडून भारतात संशोधन करण्याचा निर्णय घेतला. त्या १९९९ पासून आयआयटी दिल्ली येथे केमेस्ट्रीच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शांतीस्वरुप भटनागर पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत.

१०) मंगला नारळीकर

भारतातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संख्येने असणाºया गणिततज्ज्ञांमध्ये मंगला नारळीकर यांचा समावेश होतो. विवाहानंतर १६ वर्षांनी त्यांनी गणितामध्ये पी.एचडी संपादित केली. घरच्या जबाबदाºया सांभाळून संशोधन व अभ्यास केल्यामुळे त्या स्वत:ला पार्ट टाईम वैज्ञानिक म्हणवून घेतात. गणितासारख्या रुक्ष वाटणाºया विषयाची रुची मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मुंबई आणि पुणे विद्यापीठांमध्ये त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे.

Hope it helpful

mark me brainlist and drop likes

Similar questions