विज्ञानामुळे आता तुमच्या शाळेतील अध्ययन
अध्यापनात कोणती प्रगती झाली?
Answers
Explanation:
आजची पिढी घडवू इच्छिणारा प्रत्येकजण अथकपणे काम करतो आहे. शाळा बंद आहेत, पण शिक्षण सुरू आहे. ध्येयमंत्र जपत ऑनलाइन शिक्षणाचे विविध मार्ग अनुसरले जात आहेत. हे करत असताना गुगल क्लासरूम, झूम आणि व्हॉट्सअॅप या पर्यायांच्या माध्यमातून मुलांना अभ्यासात खिळवून ठेवताना दीक्षा, ई-बालभारती, खान अकादमी इ. अॅप्स आणि तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेले अगणित शैक्षणिक अॅप्स देवदूतसारखे मदतीला आले आहेत.
अॅप्स, ब्लॉग्स, ई-लर्निंग यासारखे पर्याय वापरत शाळांमधील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार आणि रंजक शिक्षण देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. शाळेत मुलांच्या चाचण्या घेता याव्यात म्हणून ई-प्रश्नपेढी कशी वापरावी, ब्लॉग्सचा वापर कसा करावा, विविध विषयांचं मूल्यमापन कसं करावं, ई-बुक्स, नवीन अभ्यासक्रम, विविध अॅप्स अशा अनेक गोष्टी आज उपलब्ध करून दिल्या आहेत. या सगळ्या गोष्टी शिक्षक वापरत आहेत आणि त्याचा त्यांना फायदाही होतो आहे. अनेक शिक्षक आपापल्या कल्पनांनुसार विविध अॅप्स किंवा इतर गोष्टींची निर्मिती आणि त्यांचा प्रत्यक्ष अध्ययनात उपयोग करत आहेत. सुविधांनुसार प्रत्येक ठिकाणच्या ई-लर्निंगच्या वापराचं प्रमाण कमी-अधिक असेल, पण प्रयोगांचं वारं निश्चितपणे वाहू लागलं आहे. खरं तर अध्ययन-अध्यापन शास्त्र, बालमानसशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा एकत्रित मिलाफ म्हणजे अॅप आहे, असं म्हणता येईल. शिक्षकांनी मुलांना उपयोगी पडणारे व्हिडीओ, पीपीटी, ऑनलाइन टेस्ट असं ई-साहित्य तयार केले आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यातील दुवा आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासामध्ये ही अॅप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अॅपमुळे होणाऱ्या फायद्यांमध्ये मुलांना स्व-अध्ययन करणं सोपं होतं. आता मुलं स्वाध्याय स्वत: स्मार्ट फोनवर सोडवू शकतात. तसंच पालकांना आपल्या मुलांच्या प्रगतीची माहिती या अॅपमुळे मिळण्यास मदत होते.