Math, asked by devchejaydipgmailcom, 11 months ago

विज्ञान दिनाची माहिती सांगा मराठीतउत्तर सांगा ​

Answers

Answered by sawadatkaranil
1

Step-by-step explanation:

राष्ट्रीय विज्ञान दिवस १९२८ मध्ये भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चन्द्रशेखर वेंकट रमन यांनी कोलकत्ता येथे केलेल्या वैज्ञानिक अविष्कार म्हणजेच "रमन प्रभाव" यांचा स्मृती दिवस म्हणून दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर "राष्ट्रीय विज्ञान दिवस" मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर रमण यांचा हा शोध २८ फेब्रुवारी १९३० रोजी प्रकाशित झाला. ह्या कारणाने २८ फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मानला जाते. या कामासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा दिवस साजरा करण्याचा मूळ उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान व वैज्ञानिक उपक्रमांबद्दल आकर्षित व सतर्क करण्याचा आहे.

विज्ञान दिनाचा इतिहास: भारतामध्ये २८ फेब्रुवारी १९२८ हा एक महान दिवस होता, ह्या दिवशी प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ वेंकट रमन द्वारा भारतीय विज्ञान क्षेत्रामध्ये एक आविष्कार पूर्ण झाला. ते एक तमिल ब्राह्मण होते आणि ते विज्ञान क्षेत्राचे पहिले अशी व्यक्ती आहेत ज्यांनी विज्ञानात अश्या आविष्काराचा शोध केला. भविष्यात हा कार्यक्रम नेहमी आठवणीत राहण्यासाठी आणि सन्मानासाठी सन १९८६ मध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठी राष्ट्रीय परिषदेद्वारे भारतात २८ फेब्रुवारी हा 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून नामांकन करण्यात आले. हा दिवस दरवर्षी विद्यार्थी, संशोधन शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, भारत सरकारच्या तांत्रिक आणि संशोधन संस्था, वैद्यकीय, वैज्ञानिक सह सर्व शिक्षण संस्था मध्ये साजरा करतात.

Similar questions