विज्ञान व अंधश्रद्धा या विषयी तुमचे मत लिहा
Answers
Answer:
अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये विज्ञानाच्या आधारावर चालावे
Explanation:
आपण विज्ञानाच्या युगात जगत आहोत विज्ञानाच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मार्गाने चालावे.
अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये.
Answer:
अध्यात्मवाद्यांनी विज्ञानाचे आभार मानले पाहिजेत. तसे न करणे हा कृतघ्नपणा होईल. तात्पर्य वैज्ञानिक दृष्टिकोन हा ज्ञानाचा पाया असावा. अंधश्रद्धा निर्मूलन हे दिशाभूलीपासून समाजाला वाचविण्याचे साधन आहे.
Explanation:
विज्ञान अनुभवावर आधारीत आहे तसेच ते अनुमानालाही महत्व देते. एका उदाहरणाने हे स्पष्ट करता येईल.' इलेक्ट्रॉन' हा दिसत नाही पण त्याचे अस्तित्व वैज्ञानिक मानतात. ते कसे? इलेक्ट्रॉन्सच्या गतीचे परिणाम आपल्याला दृश्य स्वरुपात पहाता येतात. टेलिव्हिजनच्या पडद्यावर इलेक्ट्राँसचा नाच चालू असतो. त्याचा परिणाम म्हणून पदडद्यावर चित्र उमटते. अणुच्या अंतरंगातील इलेक्ट्रान, प्रोटान्स वा न्यूट्रान्स दिसत नाहीत. पण त्यांचे अस्तित्व अप्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होते. म्हणून तर न्यूट्रान्स कणांच्या माऱ्यामुळे किरणोत्सारी द्रव्याचे जड अणू फुटतात व प्रचंड उर्जा प्राप्त होते.
विज्ञानात अदृश्याचे अस्तित्व गृहीत धरतात. त्यांच्या वर्तणुकीचे काही सिद्धांत मांडले जातात. त्यातून अनुमान काढले जाते. अखेरीस तपासण्याजोगा परिणाम मिळविला जातो. विज्ञानाची गृहिते ह्या श्रद्धा नव्हेत. श्रद्धा तपासायची नसते असे श्रद्धावादी म्हणतात. विज्ञानाचा आग्रह असतो श्रद्धा तपासण्याचा. गृहितावरुन काढलेले अनुमान वा निष्कर्ष चुकीचा ठरला तर गृहीत नाकारले जाते. न्यूटनची काही गृहिते चुकली. ती आज आपण मानत नाही. न्यूटन कितीही थोर असला तरी! श्रद्धा तपासून ती सिद्ध झाली तर त्याला आपण विश्वास म्हणू या. विज्ञान विश्वासावर आधारीत आहे. बटण दाबले की दिवा लागतो हा विश्वास म्हणजे विज्ञान.
#SPJ3