वाक्प्रचार अर्थ आणि वाक्य
१)आवाहन करणे-
२) हालवून सोडणे-
३)कावरेबावरे होणे-
४) अंगावर तुटून पडणे-
Answers
Explanation:
Avhan karne - don't know
Halvun sodhne-ashcharya hone
Kavrebavre hone - yed lagne
Angavarun Toton padhne - swatavarcha vishwas jane
Answer:
१. आवाहन करणे म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी उत्तेजित करणे किंवा प्रेरित करणे.
वाक्यात उपयोग-
१.भूकंपाच्या वेळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी आवाहन केले होते.
२. भारताला एक सुंदर जागा बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी स्वच्छतेचे नियम पाळण्याचे लोकांना आवाहन केले.
२. हालवून सोडणे म्हणजे धक्का देणे किंवा हैराण करणे.
वाक्यात उपयोग-
१. स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून त्यांना हालवून सोडले.
२. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील वाईट प्रवृत्तीं विरुद्ध लढा देऊन उच्चवर्णीयांना हालवून सोडले.
३. कावरेबावरे होणे म्हणजे गोंधळात पडणे.
वाक्यात उपयोग-
१. अचानक परीक्षेचे वेळापत्रक आल्याने विद्यार्थी कावरेबावरे झाले.
२. राहुल नोकरीवरून काढून टाकल्यामुळे तो कावरा बावरा झाला.
४. अंगावर तुटून पडणे म्हणजे जोरदार हल्ला चढवणे.
वाक्यात उपयोग-
१. शिवाजी राजांचे मावळे मोगलांच्या अंगावर तुटून पडले.
२. सीमेवर थोडी जरी हालचाल दिसली तरी आपले सैनिक शत्रूच्या अंगावर तुटून पडतात.
Explanation