India Languages, asked by maheshraut7299, 1 month ago

३) वाक्प्रचार:
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगून त्याचा वाक्यात
उपयोग करा. (कोणतेही २)
अ) शहानिशा करणे
ब) कानोसा घेणे
क) पेव फुटणे
ड) लळा लावणे

Answers

Answered by borhaderamchandra
20

Answer:

शहानिशा करणे- खातरजमा (खात्री) करून घेणे

आरोपी ने केलेल्या गुन्ह्याची शहानिशा करून न्यायाधीश त्याला शिक्षा सुनावतात

लळा लावणे- एखाद्यावर जीवापाड प्रेम करणे आणि त्याच्या वाचून कर्मेनासे होणे

आमच्या घरातल्या पाळलेल्या सशाने सर्वाना च एक महिन्यात लळा लावला

Answered by jitumahi435
4

वाक्प्रचार हा शब्दश: असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला शब्द समूह असतो.

अ)शहानिशा करणे

अर्थ: खात्री करणे

वाक्य: पोलिसांनी चोरीच्या बातमीची शहानिशा केली .

ब) कानोसा घेणे

अर्थ: अंदाज घेणे

वाक्य: सैनिकांनी विरुद्ध सैन्याच्या योजनांचा कानोसा घेतला.

क) पेव फुटणे

अर्थ: भराभर बाहेर पडणे, संख्या वाढणे

वाक्य: आजकाल सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे .

ड) लळा लावणे

अर्थ: लोभ लावणे , माया लावणे

वाक्य: शाळेतील बाईंनी लहान मुलांना लळा लावला.

Similar questions