India Languages, asked by ananyayadav1108, 4 days ago

वाक्प्रचार on body parts in marathi​

Answers

Answered by riyars080102
0

Explanation:

  1. कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे.
  2. कपाळमोक्ष होणे- मृत्यू येणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे.
  3. कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे.
  4. काढता पाय घेणे- विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे .
  5. कानउघाडणी करणे- चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.
  6. कान उपटणे- कडक शब्दात समजावणे.
  7. कान टोचणे- खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.
  8. कान निवणे- ऐकुन समाधान करणे.
  9. कान फुंकणे- चुगली/ चहाडी करणे
  10. कानाला खडा लावणे- एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे.
  11. कानावर हात ठेवणे- नाकबूल करणे.
  12. कानीकपाळी ओरडणे- एक सारखे बजावून सांगणे.
  13. कानावर घालणे- लक्षात आणून देणे.
  14. केसाने गळा कापणे- घात करणे.
  15. कंठ दाटून येणे- गहिवरून येणे.
  16. कंठस्नान घालने- शिरच्छेद करणे.
  17. कंठाशी प्राण येणे- खूप कासावीस होणे.
  18. कंबर कसणे- जिद्दीने तयार होणे.
  19. कंबर खचणे- धीर सुटणे.
  20. खांद्याला खांदा भिडवने- सहकार्य व एकजुटीने काम करणे.
  21. गळा काढणे- मोठ्याने रडणे
Similar questions