World Languages, asked by sharadgaikwad8214, 10 months ago

वाक्प्रचार व वाक्यत उपयोग​

Answers

Answered by surysbhanr433
8

Explanation:

) नाव मिळवणे.

अर्थ :- कीर्ती मिळविणे.

वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम

येऊन सुप्रियाने नाव मिळविले.

-------------------------------------------------

(२) रक्ताचे पाणी करणे.

अर्थ :- खूप कष्ट करणे.

वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी

केले आणि स्वराज्याची स्थापना केली.

-------------------------------------------------

(३) सोंग काढणे.

अर्थ :- नक्कल करणे.

वाक्य :- सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब

सोंग काढतो.

------------------------------------------------

(४) रात्रीचा दिवस करणे.

अर्थ :- खूप कष्ट करणे.

वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलांनी

सानियाला शिकवले.

-------------------------------------------------

(५)भांबावून जाणे.

अर्थ :- गोंधळून जाणे.

वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात

आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो

भांबावून गेला.

-------------------------------------------------

(६)डोक्यावर घेणे.

अर्थ :- अतिलाड करणे.

वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला

आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर

घेतले.

------------------------------------------------

(७) आळा घालणे.

अर्थ :- बंदी आणणे.

वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा

देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला.

--------------------------------------------------

(८) तीरासारखे धावणे.

अर्थ:- खूप वेगाने धावणे.

वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश

स्पर्धेत तीरासारखा धावतो.

--------------------------------------------------

(९) मर्जी राखणे.

अर्थ :- खूश ठेवणे.

वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी

जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली.

--------------------------------------------------

(१०) संगोपन करणे.

अर्थ :- पालनपोषण करणे.

वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने

तिचे संगोपन केले.

you want more search in google

Answered by deepsawant435
4

Answer:

1) अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.

2) अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.

3)अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

4) अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.

5) अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.

6) अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.

7) अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.

8) अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.

9)अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

10) अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

Explanation:

Please give me a like

Similar questions