विकास विद्यालय कारंजा येथील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने किशोरवयीन विद्यार्थ्यांकरिता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यासाठी मा. पोलीस अधिकारी यांना विनंती करणारे पञ लिहा .
Answers
Answer:
विकास विद्यालय कारंजा येथील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने किशोरवयीन विद्यार्थ्यांकरिता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यासाठी मा. पोलीस अधिकारी यांना विनंती करणारे पञ लिहा .
Explanation:
please mark me as brainlist
Answer:
दिनांक:२२ जानेवारी,२०२२
प्रति,
माननीय पोलीस अधिकारी,
कारंजा पोलीस स्टेशन,
कारंजा-४२५४०१
विषय- किशोरवयीन विद्यार्थ्यांना सुरक्षेविषयक मार्गदर्शन करण्याबाबत
माननीय महोदय,
मी कारंजा येथील विकास विद्यालय येथील इयत्ता दहावी चा विद्यार्थी असून आपणास विनंती करतो की आमच्या शाळेतील किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतःची सुरक्षा कशी करावी यासाठी मार्गदर्शन करावे.
मुले व मुली किशोर वयात आल्यानंतर त्यांनी स्वतःची व इतरांची सुरक्षा कशी करावी हे त्यांना माहीत असले पाहिजे. आपल्या गावातच पोलीस स्टेशन असल्याकारणाने आम्हाला जर तुम्ही मार्गदर्शन केले तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल. मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून त्यासाठी परवानगी काढली आहे.
मी आपणास विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विनंती करतो की कृपया आम्हाला सुरक्षेविषयी मार्गदर्शन करावे.
आपला विश्वासू,
सुमित पाटील
इयत्ता दहावी
विकास विद्यालय कारंजा