India Languages, asked by jyotibattul58, 5 months ago

वृक्षा आपले श्वास आहे​

Answers

Answered by XxitsmrseenuxX
52

Answer:

वृक्ष हे आपला "श्‍वास' आहे. ती जीवंत राहली तरच आपण जगू शकतो. त्यामुळे लहानपणापासून मुलांना वृक्षारोपणाचे महत्व सांगितले पाहिजे. तर मोठ्यांनी दरवर्षी वृक्षारोपण करून त्याचे जतन करण्याची जबाबदारी स्वत: घ्यावी असे आवाहन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार यांनी केले. वाढदिवस, स्मृतीदिन, जयंती या दिवशी वायफळ खर्च करण्यापेक्षा प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असेही पवार यांनी सांगितले.  

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील एन.एस.एस. व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने हनुमान टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. यावेळी पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, उपप्राचार्य अपेक्षा जाधव, एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी लक्ष्मण उकिर्डे, प्रा. हरिदास खेसे, प्रा.  

अशोक शेळके यासह सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. वृक्ष लागवड केली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे होत नाही. त्याचे जतन करणे ही खरी आपली जबादारी असल्याचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांनी सांगत उपस्थित विद्यार्थ्यांकडून लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची शपथ घेतली.

यावेळी हनुमान टेकडीवर चिंच, कडुलिंब, करंजा, जांभूळ अशी विविध वृक्ष लावण्यात आली.

HOPE THIS WILL HELP YOU

PLZ.. MARK THIS ANSWER AS BRAINLIEST

Similar questions