Hindi, asked by dilipshinde6009, 1 month ago

वृक्षारोपण आणि वृक्षासंगोपन करण्यासाठी तुम्ही व तुमचे मित्र काय कराल?​

Answers

Answered by vandanapargaonkar060
17

Answer:

आपल्या भारताची लोकसंख्या जसजशी वाढत आहे तसतशी झाडेसुद्धा कमी होत आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असल्याचे आपण पाहत आहोत. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले. जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदुषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावं लागत आहे. म्हणून 'झाडे लावा झाडे जगवा' ही संकल्पना राबविली जात आहे. व प्रत्येक वर्षी त्याप्रमाणे वृक्षारोपण पण केलं जातं व वृक्षलागवडीची वृक्षांची संख्या सरकारी आकडेवारीनुसार लाखोंवर सांगितली जाते, पण जी लाखो झाडे लावली जातात, त्याच्यातली जगतात किती? किंवा जगविण्याचे प्रयत्न किती केले जातात, याचा विचार व्हायला हवा! फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यांचं संवर्धनसुद्धा करणं, ही काळाची गरज आहे. दरवर्षी झाडे लावली जातात; पण झाडे लावण्याचे खड्डे तेच असतात, फक्त झाडे बदलतात. असे चित्र खूप वेळेस पाहायला मिळते. म्हणून जसे झाड लावतो तसे त्याचे संवर्धन करून त्याला मोठे करण्यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरून आपण केलेल्या वृक्षारोपणाची वृक्ष पुढच्या काळात रूबाबात डोलतांना आपल्याला पाहायला मिळेल.

hope it helps you

Answered by srnroofing1717
2

शेकडो झाडे तोडून त्या ठिकाणी मोठी इमारत उभी केली जाते, असे चित्र आपण पाहतो. अशाप्रकारे सर्रासपणे वृक्षतोड केली जात आहे. या वृक्षतोडीमुळे मानवी जीवनासोबत वन्यजीव, पशुपक्षी यांचे जीवनसुद्धा धोक्यात येत आहेत. वृक्षतोडीने जंगले नष्ट केली जात आहेत. आणि त्यामुळे वन्यप्राणी मानवी वसाहतीवर हल्ले करू लागले आहेत. तसे पाहिले तर ते वन्यप्राणी आपल्या वसाहतीवर हल्ले करीत नाही, तर आपण त्यांच्या वसाहतीवर हल्ले करीत आहोत, असं म्हणायला काही हरकत नाही. सरकार दरवर्षी 'झाडे लावा झाडे लावा' ही संकल्पना राबवून वृक्ष लागवड करते; पण त्याचे संवर्धन आपण करीत नाही. म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी आपण सर्वांनी स्वत:हून सहभाग घेतला पाहिजे. आपला किंवा आपल्या परिवारातील कुणाचा वाढदिवस असेल, तर आपल्या मित्रपरिवाराला आपण हजारो रूपये खर्च करून पार्टी देतो. जर त्या पार्टीऐवजी आपण त्या वाढदिवशी आपल्या मित्रांकडून वृक्षारोपण करून त्याच पार्टीच्या पैशाचा वापर 'झाडं संरक्षण जाळी' यासाठी वापरला तर तीच झाडं मोठी झाल्यावर आपण अभिमानानं सांगू शकतो ही झाडं आम्ही आमच्या अमक्या-अमक्या वाढदिवशी लावली होती. त्याची एक कायमची आठवण आपल्याला राहील. काहीतरी निमित्त साधून आपल्याला वृक्षारोपण करण्याची आज गरज आहे. विशेषत: देशातील वनविभागांनी वृक्ष संवर्धनाकडे गांर्भिर्याने पाहायला पाहिजे. उदाहरण दाखल चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनविभागाने (एफडिसीएम) वृक्षसंवर्धनाची विशेष काळजी घेतल्याचे दिसते. वनपरिक्षेत्राधिकारी जंगिलवाड यांनी या तीन वर्षांत ४४६ हेक्टरचे जंगल सुशोभित केले आहे. यावर्षी त्यांनी ५६२५० टिक प्लॅन्ट्स (साग वगैरे) व ७५६०० फळझाडे लावली. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी जुलैमध्ये मागील वर्षांची जिवंत झाडे जेव्हा पाहिली तेव्हा त्यांनी समाधान व्यक्त केले व यावर्षीची झाडे अशीच जगवा असे ते म्हणाले.

Explanation:

\huge\tt\red{Thank you}

Similar questions