वृक्षारोपण,वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, झाडे लावा झाडे जगवा...
Answers
Answer:
झाडे मानवजातीसाठी निसर्गाची अनमोल भेट आहेत. ते आपल्याला श्वास घेण्यास ऑक्सिजन व उन्हाळ्यात सावली प्रदान करतात. वातावरण थंड ठेवतात.झाडाचा प्रत्येक भाग कशा ना कशा प्रकारे तरी उपयुक्त ठरतो.
पण औद्योगिकीकरण आणि निवाऱ्याकारिता जागा वाढवण्यासाठी झाडे तोडली जात आहेत.वृक्षतोडीमुळे एके काळी दिसणारे जंगल आता नाहिसे झाले आहे.याच्या परिणामस्वरूप वातवरणात बदल होत आहे,जागतिक तापमान वाढ होत आहे.निसर्गाचा तालमेल बिघडत चालला आहे.पावसाचा प्रामाण कमी झाला आहे.काही ठिकाणी तर दुष्काळ स्तिथी निर्माण झाली आहे.प्रदूषणात वाढ झाली आहे.वनातील प्राण्यांचे जीवन संकटात आले आहे.
झाडे हे आपल्या अस्तित्वासाठी खूप महत्वाचे आहेत कारण त्यांच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन मिळते आणि जर झाडंच नाही राहिली तर आपले जीवन संकटात येईल व आपल्याला भरपूर समस्यांना सामोरे जावे लागेल.
सरकार आणि काही संघटनांनीसुद्धा वृक्षतोड थांबवण्यासाठी अनेक उपक्रम आणि कायदे बनवले आहेत.सोशल मीडिया, शाळा,कॉलेज,रेडियो,टीव्ही यांच्या माध्यमाने लोकांमध्ये झाडं लावण्यासाठी आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी जनजागृती केली जात आहे.आपण प्रत्येकाने वृक्षतोड थांबवले पाहिजे व नवीन झाडे लावली पाहिजेत.
Explanation:
Answer:
वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' हे संसारात राहूनही विरक्त जीवन जगणाऱ्या तुकाराम महाराजांचे बोल आहेत. आपल्यासारख्या चालत्या-बोलत्या माणसांपेक्षा गावाबाहेरच्या जंगलातील, उपवनातील वृक्ष-वेली त्यांना आपल्याशा वाटतात. मानवी जगातील क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अशा विकारांपासून दूर असणारी ही वृक्ष-वेली तुकारामांना जास्त आवडतात; कारण त्यांच्या सहवासातच या महान भक्ताला आपल्या मनाशी संवाद साधता येतो. मानव आणि ही वनस्पतिसृष्टी ही एकाच विधात्याची लेकरे. पण आज माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. स्वतः केलेल्या प्रगतीमुळे त्याच्यातील अहंकार वाढला आहे.
'मला काहीही अशक्य नाही,' असे तो मानतो. आपला भूतकाळ तो विसरून गेला आहे. याच निसर्गाच्या कुशीत आपण वाढलो, हे तो विसरला आहे. याच वृक्षवल्लींच्या सान्निध्यात नित्य विहार करणाऱ्या आपल्या ऋषिमुनींनी 'वेद' रचले. भारतीय संस्कृतीची भक्कम बैठक आम्हांला दिली, हे सारे सोयीस्करपणे आपण विसरलो आहोत. प्रगतीचा कैफ चढलेल्या माणसांनी परमेश्वरनिर्मित निसर्गावर घाला घातला आहे.
विवेक हरवून बसलेल्या आजच्या माणसांत चंगळवादाला उधाण आले आहे. मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी दाट अरण्ये उद्ध्वस्त केली जात आहेत. अन्न शिजवण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी, घरे सजवण्यासाठी वारेमाप जंगलतोड केली जात आहे. कायदयाचा बडगा उगारला तरी कोट्यवधी रुपयांच्या चंदनाची चोरी होतच आहे.
हे सारे पाहिले की वाटते, हा माणूस किती अविचारी आहे ! निसर्ग जणू माणसाला सांगतो की, अरे, हे वृक्ष वर्षानुवर्षे जंगलात उभे आहेत ते तुमच्यासाठीच ना ! त्यांची फुले, फळे, पाने, सावली हे सारे तुमच्यासाठीच आहे ना! म्हणून तर तुमच्या पूर्वजांनी त्यांची बरोबरी संतपुरुषांबरोबर केली. वृक्ष बाहू पसरून आपल्यासाठी पावसाची प्रार्थना करतात. आपल्या मुळांनी पायाखालची जमीन घट्ट पकडून ठेवतात. जमिनीची धूप थांबवतात. वातावरणातील प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करतात. अनेक अमूल्य औषधे देतात.
हे वृक्ष, या वेली अनेक मौलिक गोष्टी आपल्याला देतात. उदात्तता, भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची ठेवच आहे. पण 'सर्वांशी समान वागणूक' हा त्यांच्या जीवनातून मिळणारा संदेश आहे. म्हणून माणूस आपल्या मुलाबाळांशी जसा वागतो, तसाच तो झाडांशीही वागला पाहिजे. हा संदेश जाणून सामाजिक वनीकरणाचे व्रत सर्वांनी स्वीकारले पाहिजे.