India Languages, asked by nayanmanocha3659, 1 year ago

वृक्षारोपण,वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, झाडे लावा झाडे जगवा...

Answers

Answered by Hansika4871
2

१७ सप्टेंबर २०१९, मंगळवार

काल १६ सप्टेंबर २०१९ रोजी कुडाळ गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला. बघुया त्याची एक झलक.

गावात अवकाळी पाऊस, प्राणवायू कमी होणे, हिरवेगार शेत नष्ट होणे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता गावकऱ्यांना असे समजले की गावात झाडांचे प्रमाण खूप कमी झाले आहे आणि ह्या मुळे खूप कठीण परिस्थितीनं सामोरं जावं लागतं आहे. म्हणूनच "हरियाली ट्रस्ट" च्या साहाय्याने गावात २५० झाडे लावायचा निर्णय घेतला.

काल गावातील सगळे तरुण/तरुणी, गावकरी व वयस्कर लोक देखील हजर होते. गावातल्या सरपंच ह्यांनी सर्वात पाहिले झाड लावून कार्यक्रमाला सुर्वात केली. आंबे, आवळे, फणस, वेगवेगळी फुलझाडे ह्या सगळ्यांचा समावेश त्या झाडांमध्ये होता. "झाडे लावा, झाडे जगवा" हे वाक्य सगळे गावकरी आनंदाने बोलत होते.

Answered by ItsShree44
3

Answer:

वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' हे संसारात राहूनही विरक्त जीवन जगणाऱ्या तुकाराम महाराजांचे बोल आहेत. आपल्यासारख्या चालत्या-बोलत्या माणसांपेक्षा गावाबाहेरच्या जंगलातील, उपवनातील वृक्ष-वेली त्यांना आपल्याशा वाटतात. मानवी जगातील क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अशा विकारांपासून दूर असणारी ही वृक्ष-वेली तुकारामांना जास्त आवडतात; कारण त्यांच्या सहवासातच या महान भक्ताला आपल्या मनाशी संवाद साधता येतो. मानव आणि ही वनस्पतिसृष्टी ही एकाच विधात्याची लेकरे. पण आज माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. स्वतः केलेल्या प्रगतीमुळे त्याच्यातील अहंकार वाढला आहे.

'मला काहीही अशक्य नाही,' असे तो मानतो. आपला भूतकाळ तो विसरून गेला आहे. याच निसर्गाच्या कुशीत आपण वाढलो, हे तो विसरला आहे. याच वृक्षवल्लींच्या सान्निध्यात नित्य विहार करणाऱ्या आपल्या ऋषिमुनींनी 'वेद' रचले. भारतीय संस्कृतीची भक्कम बैठक आम्हांला दिली, हे सारे सोयीस्करपणे आपण विसरलो आहोत. प्रगतीचा कैफ चढलेल्या माणसांनी परमेश्वरनिर्मित निसर्गावर घाला घातला आहे.

विवेक हरवून बसलेल्या आजच्या माणसांत चंगळवादाला उधाण आले आहे. मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी दाट अरण्ये उद्ध्वस्त केली जात आहेत. अन्न शिजवण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी, घरे सजवण्यासाठी वारेमाप जंगलतोड केली जात आहे. कायदयाचा बडगा उगारला तरी कोट्यवधी रुपयांच्या चंदनाची चोरी होतच आहे.

हे सारे पाहिले की वाटते, हा माणूस किती अविचारी आहे ! निसर्ग जणू माणसाला सांगतो की, अरे, हे वृक्ष वर्षानुवर्षे जंगलात उभे आहेत ते तुमच्यासाठीच ना ! त्यांची फुले, फळे, पाने, सावली हे सारे तुमच्यासाठीच आहे ना! म्हणून तर तुमच्या पूर्वजांनी त्यांची बरोबरी संतपुरुषांबरोबर केली. वृक्ष बाहू पसरून आपल्यासाठी पावसाची प्रार्थना करतात. आपल्या मुळांनी पायाखालची जमीन घट्ट पकडून ठेवतात. जमिनीची धूप थांबवतात. वातावरणातील प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करतात. अनेक अमूल्य औषधे देतात.

हे वृक्ष, या वेली अनेक मौलिक गोष्टी आपल्याला देतात. उदात्तता, भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची ठेवच आहे. पण 'सर्वांशी समान वागणूक' हा त्यांच्या जीवनातून मिळणारा संदेश आहे. म्हणून माणूस आपल्या मुलाबाळांशी जसा वागतो, तसाच तो झाडांशीही वागला पाहिजे. हा संदेश जाणून सामाजिक वनीकरणाचे व्रत सर्वांनी स्वीकारले पाहिजे.

Similar questions