वृक्ष संवर्धन निबंध मराठी विकिपीडिया
Answers
Answer:
आपल्या जमिनीची दर वर्षी येणारी पिके घेतली कि झाले आपले काम झाले असे मानून आजचा शेतकरी राहिलेल्या वेळेत जोड धंदा करण्याऐवजी सरकारच्या आशेवर जगतो. पण शेतीहा धंदा व्यापक व अनेक गोष्टी वर अवलंबून असणारा आहे त्यामुळे आजच्या बदलत्या ऋतूचक्रा मुळे कोणती गोष्ट कधी दगा देईल हे सांगता येत नाही. शेतीसाठी सुपीक जमीन, हवामान, योग्य बी बियाणे, पाण्याची उपलब्धता, कीड नियंत्रण इत्यादी घटक बरोबरच वन म्हणजे जंगल हा एक महत्वाचा भाग आहे . पण या घटक कडे सर्वाचं दुर्लक्ष्य आहे. हि एक चिंता जनक बाब आहे. चांगली जंगले असतील तर तेथील पाऊसमान वाढेल असे तंज्ञाच्ये मत आहे. हे समाजाला व शासनाला माहित आहे तरी या गोष्टी कडे दुर्लक्ष्य आहे. जंगलाचा पालापाचोळा वाहून आल्याने जमीन सुपीक होतील त्यांच्यातील शेंद्रियें घटक वाढल्यास उत्पादन वाढेल त्याच बरोबर जंगलामुळे जमिनीत पाणी झिरपणयाच्या प्रमाणात वाढ होईल व भूजल पातळी वाढेल हे नक्कीच, केवळ जमिनीची धूप थांबवणे व पाणी पातळी वाढवणे एवढ्याच गोष्टी लक्ष्यात घेतल्या तरी शेतीसाठी किती महत्वाच्या आहेत हे आपल्याला लक्षात येईल.
शेती हा धंदा देशाला खूप महत्वाचा धंदा आहे. स्वत्र्यiनंतर देशात प्रचंड उद्योग धंदे सुरु झiले परुंतु शेती ह्या धंद्या ची जागा कोणीच घेऊ शकला नाही व घाऊ शकणारहि नाही हे तितकंच खरे. तरीही शेती ह्या धंद्याकडे सरकारचे पाहिजे तसे लक्ष्य राहिले नाही. जर आज सरकारचे शेती कडे लक्ष्य राहिले असते तर सरकारने वन संगोपन व वन संरक्षण केले असते. महाराष्ट्रातील जंगले दिवसेन दिवस पोरकी होत चालली आहेत त्यांना कोणीच वाली राहिलेला नाही. पूर्वी आदीवासी समाज हा आजच्या शिक्षित समाज पेक्षा किती तरी प्रमाणात चांगले मानावे लागेल, कारण कि आदीवासी समाज जंगलातून मिळणाऱ्या संसाधनाची परतफेड करायचा व वाणांची पूजा करायचा त्यातून वन सनसंरक्षण व वन संवर्धन होत होते. पण आजच्या शिक्षित समाजाला फक्त वृक्ष तोड माहित आहे . त्यामुळे जमिनी सोडाच डोंगर टेकड्या सुद्धा उगड्या बोडक्या झाल्या आहेत. अर्थात त्याचा भीषण परिणाम आपल्याला भोगावं लागत आहेत.
त्यामुळे शेतकऱयांचे नुकसान झाले. जमिनीची सुपीकता नष्ट झाली आहे. त्याचा परिणाम पाहता उत्पन्न कमी झाले. आज गावच्या गावे अशी आहेत कि ज्या ठिकाणी वर्षभर लोकांना प्यायला पाणी नसते. शेतातल्या विहिरींना पाणी कमी आसते. शेत, टेकड्या, माळ रान उजाड झाल्याने हवा रखरखीत व उष्ण होत आहे, कारण कि माणसाने बेसुमार झाडे तोडल्यामुळे त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळत आहे.
- वृक्ष लागवड म्हणजे जमिनीत रोपे लावणे. हे भारतात जुलै ते सप्टेंबर या काळात पावसाळ्यात केले जाते. रोपे पृथ्वीवर लावली जातात आणि उगवलेले प्रकार या प्रदेशातील माती आणि हवामानावर आधारित असतात.
- सध्याच्या हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या युगात वृक्षारोपण महत्त्वपूर्ण आहे. झाडे कार्बन डायऑक्साइड तसेच अनेक विषारी पदार्थ घेतात आणि सर्व सजीवांना श्वास घेण्यासाठी स्वच्छ ऑक्सिजन देतात. पावसाळ्यात झाडे मातीची झीज होण्यापासून आणि धोक्यात येण्यापासून रोखतात. ते मातीला मुळांसह धरून ठेवतात. वृक्षारोपण आवश्यक आहे कारण ते पक्षी आणि कोआला अस्वल आणि झाड बेडूक सारख्या अनेक प्राण्यांचे घर आहे. झाडे पृथ्वीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे ते थंड होते. झाडे आपल्याला फळे आणि भाज्या देखील देतात. ते आम्हाला घर, फर्निचर आणि कागद बनवण्यासाठी लाकूड देतात.
- आपल्या सभोवतालच्या हिरवळीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व शिकवतात आणि विद्यार्थी शाळांमध्ये झाडे लावतात. जगभर वृक्षारोपण केले जाते. भारतात वृक्षारोपण दिवस हा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वन महोत्सव म्हणून साजरा केला जातो.