World Languages, asked by palvechaitanya01, 8 days ago

वृक्ष संवर्धन या काळाची गरज या विषयावर निबंध लिहा​

Answers

Answered by suteekshnad
1

वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढय़ांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.

लोकसंख्या विस्फोट, प्रदूषण, जंगलतोड, पर्यावरणाची नासाडी यामुळे पृथ्वीवरील वाढता ताण विचारात घेऊन सन १९९२ मध्ये ‘रिओ दि जानेरो’ येथे पहिली वसुंधरा शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या जागतिक परिषदेत पृथ्वी वाचविण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली व त्या आनुषंगाने काही महत्त्वपूर्ण ठरावही संमत करण्यात आले. यावेळी ‘अजेंडा-२१’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या घोषणापत्राने पर्यावरणाचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघ आणि देशोदेशीच्या सरकारांच्या कार्यक्रमपत्रिकेवर आला. ही शिखर परिषद पार पडून आता जवळपास २५ वर्षाचा काळ लोटला आहे. दरम्यानच्या काळात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिघडत गेली आहे.एकूण सारासार विचार करता पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे. पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये वने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक मोठे झाड छोटय़ा-छोटय़ा वनस्पती, कीटक, प्राणी-पक्षी यांना आसरा देते. विषारी कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमानवाढ कमी करते आणि प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे उर्त्सजन करते. वनांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व पूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. तसेच वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते. यातून भारतीय वनसर्वेक्षणाचा इतिहास व त्याचे महत्त्व, भारतीय वनसंपत्तीसमोरील संधी व आव्हाने, तसेच वनशेती किंवा वनीकरणाच्या दृष्टीने आवळा लागवडीचे महत्त्व अधोरेखित होईल, असा आम्हाला विश्वास आहे. पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. म्हणूनच वनक्षेत्र वाढण्यासाठी सर्वानी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे.

Answered by Jiya0071
2

Answer:

निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं… आज हाच माणूस आपल्या उपकारकर्त्यावर उलटला आहे.

मनमोही पावसाने निसर्गासारखेच माझ्या अंतर्मनाला मोहविले आहे. झिमझिमणार्‍या पावसात सृष्टीचे सुजलाम् सुफलाम् रूप न्याहाळताना नकळत तुकाराम महाराजांचे भावमधुर काव्य आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरांचा साज लाभलेले कर्णमधुर गीताने कान टवकारले –

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |

पक्षीही सुस्वरे आळवीती ॥

वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान. संथपणे एका लयीत बरसणार्‍या पावसाच्या सरींनी बहरलेल्या सृजनशील निसर्गाच्या सान्निध्यात सृष्टीचा दृक्‌श्राव्य अनुभव घेता यावा, यासारखे भाग्य ते कोणते? मनातील आठवणींची पिसे भिरभिरू लागली.

धरणीमातेने मुक्त हस्ते बहाल केलेला मौल्यवान खजिना म्हणजे वृक्ष आणि वेली. ‘परोपकाराय फलन्ति वृक्षाः’ या शब्दात वृक्षांचा गौरव केलेला आहे. निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार पुरातन कालापासून आहे. अगदी अनादी कालापासून निसर्ग मानवाचा मित्र आहे. वृक्ष ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.

अलीकडे पर्यावरण प्रदूषणाविषयी बरेच काही वर्तमानपत्रातून वाचायला मिळते. प्रदूषणाचे दुष्परिणाम आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच पृथ्वीचा, मानवाने सुरू केलेल्या जंगलतोडीमुळे पृथ्वीचा समतोल बिघडत चाललेला आहे.

Similar questions