Environmental Sciences, asked by roshanchavanchavan67, 4 months ago

वृक्ष तोड एक समस्या इन मराठी प्रोजेक्ट

Answers

Answered by Anonymous
18

Answer:

‘वृक्षतोड - एक समस्या’ हा प्रकल्प सादर करताना पुढील उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून पर्यावरण व जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी मी हा प्रकल्प सादर करत आहे.

Explanation:

·      वृक्षतोडीचे भयानक परिणाम लोकांना समजावून सांगणे व नागरिकांत याबाबत कर्तव्य व जबाबदारीची भावना / जाणीव निर्माण करणे आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रयत्न करणे.

·      वृक्ष लागवडीमुळे होणार्‍या विविध फायद्यांचा प्रचार करणे.

·      चांगले उत्पन्न, बहुविध फायदे असणार्‍या वृक्षांची लागवड करणे व इतरांना विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यास प्रेरित करणे, प्रोत्साहन देणे.

·      वनौषधी वनस्पती लागवडीच प्रचार करणे.

·      जमिनीची धूप थांबवणे.

·      भूजल पातळीत वाढ करणे.

·      वाळवंटी प्रदेश कमी करण्यासाठी प्रयत्न करणे.

·      वनक्षेत्र वाढवणे.

·      दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती वाचवणे.

·      वातावरणातील उष्णता नियंत्रणात आणणे.

·      वायू प्रदूषणावर नियंत्रण आणणे.

·      पडीक जमीन लागवडीखाली आणणे.

·      स्वच्छ, सुंदर, सुरक्षित, प्रदूषणविरहित, रमणीय पर्यावरणाची निर्मिती करणे.

प्रकल्पाचे विश्लेषण

Ø    जंगलाची उपयुक्तता : झाडे हवेतील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायु हवेत सोडतात.

·      अनेक झाडे ओझोनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात.

·      दुर्मिळ प्राणी, वनौषधी वनस्पती यांचे जतन जंगलांमुळेच होत     असते.

·      घनदाट जंगलांमुळेच हवेतील बाष्प शोषून घेतल्याने त्यातील थंडावा राखला जातो.

·      पावसाची तीव्रता जंगल भागात अधिक असते. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते अन् भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात वाढ होते.

·      खोलवर रुजलेल्या मुलाच्या सहाय्याने जमिनीची धूप थांबवली जाते अन् जमिनीची सुपीकता कायम राहते.

Answered by reshmakodde
0

Answer:

vruksh tod ek samasya in hindi project

Similar questions
English, 2 months ago