वृक्ष वल्ली आम्हा सोयारी हा अभंग कोणी लिहिले
Answers
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षिणी सुस्वरे आळविती’असं संत तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय. त्यांचा हा अभंग लताबाईंच्या कंठातून आपण अनेकदा ऐकलाय. कवीला निसर्गाची ओढ असेलच, पण मुळात माणूस नावाचा प्राणी त्या निसर्गाचाच एक अविभाज्य घटक आहे. जगभरच्या काव्यातून चित्रित झालेला रम्य निसर्ग गेल्या काही वर्षांत शहरी भागातून आटताना दिसतोय. आपल्याकडेच नव्हे तर जगातल्या सगळ्याच महानगरांमध्ये काँक्रीटची जंगलं उभी राहिल्याने खरीखुरी वनसंपदा हद्दपार झालीय. मग कधीतरी एकाच पद्धतीची कवायती छापाची झाडं लावण्याची टूम निघते आणि वनीकरण म्हणून स्वतःचीच पाठ थोपटायला एक समारंभ मिळतो. निलगिरी एके निलगिरी किंवा सुबाभूळ तर सुबाभूळच अशा प्रकारच्या ‘लागवडी’ने जंगल, वन, कानन, अरण्य विकसित होत नसतं. ती एक हजारो वर्षांची नैसर्गिक प्रक्रिया असते. अमेरिकेच्या ऑरिझोना खोऱयात पाच-सातशे वर्षांचे पुराण वृक्ष आजही दिमाखाने खडे आहेत. मुंबईतही शे-दोनशे वर्षे वयाची झाडं अपवादात्मक का होईना, पण दिसतात.
Explanation: