वृक्षसंवर्धनाचे फायदे
Answers
वृक्ष आपल्या पानावाटे (पर्णातून) हवेत ओलावा सोडतात. त्याला पर्णोत्सर्जन म्हणतात. पर्णोत्सर्जनामुळे हवेत ओलावा निर्माण होत असल्याने पिकाची उत्पादकता वाढते. जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. वृक्षांनी वाळलेली पानी जमिनीवर पडली की जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढतात. ते जमिनीची जलधारणा शक्ती वाढवितात. सेंद्रिय पदार्थ कुजून त्यापासून खत तयार होते. त्यातील अन्नांशी पिकांना उपलब्ध होत असल्याने उत्पादकता वाढते. पशुपक्षी येतात, ती कीड नष्ट करतात. फळे, भाज्या, तेले, चारा, इमारतीसाठीची लाकडे, जळतन, औषधी आदी वृक्षांपासून मिळते. वृक्ष हे बहुउपयोगी आहेत. जगातील भरमसाठी कार्बन उत्सर्जनामुळे वसुंधरेचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. ते तापमान कमी करण्याचा वृक्षलागवड हा एक प्रभावी उपाय आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता एकूण भूभागाच्या 33 टक्के भूभागावर वने (जंगले) असणे निकडीचे आहे, पण आजमितीला लोकसंख्येच्या विस्फोटामुळे व तुमच्याआमच्या बेजबाबदार आचरणामुळे भूभागावर आज वने जेमतेम 11 टक्केच असल्याने अनेक जीवघेण्या समस्या निर्माण झाल्या आहेत |
आशा है कि मेरा उत्तर आपकी सहायता करेगा
धन्यवाद
झाडे, झुडुपे आणि इतर बारमाही वनस्पतींचा अभ्यास, लागवड आणि व्यवस्थापन म्हणून वृक्षसंवर्धनाची व्याख्या केली जाते. वृक्षसंवर्धनाचे अनेक सामाजिक तसेच वैयक्तिक फायदे आहेत, जे खालीलप्रमाणे दिले आहेत:
- हा सराव पर्यावरणासाठी खूप फायदेशीर आहे. झाडे हवा शुद्ध करण्यास आणि कार्बन डायऑक्साइड शोषण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, झाडे धूप रोखण्यास आणि पाणी फिल्टर करण्यास, स्थानिक जलस्रोतांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात
- ऊर्जा खर्चही कमी होतो
- वृक्षसंवर्धनाच्या सरावाने आर्थिक फायदे देखील होऊ शकतात. हे पर्यटन उद्योगाला मदत करते आणि क्षेत्राच्या सुशोभीकरणात मदत करू शकते
- झाडे आणि हिरवीगार जागा मानसिक आरोग्य सुधारू शकतात, मनोरंजनाच्या संधी देऊ शकतात आणि सामुदायिक अभिमानाची भावना वाढवू शकतात
- झाडांची लागवड आणि व्यवस्थापनाला प्रोत्साहन देऊन, आम्ही आमच्या स्थानिक समुदायांमध्ये सुधारणा करू शकतो आणि निरोगी ग्रहासाठी योगदान देऊ शकतो
#SPJ3