India Languages, asked by kumarsanu5291, 10 months ago

वृक्षतोड एक नैसर्गिक आपत्ती बद्दल माहिती

Answers

Answered by Nilambari7070
5

Answer:

निसर्गाच्या या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे दुरूस्त करणेही जमन्यासारखे नाही.

अशा मोडलेल्या बिघडलेल्या चक्रांपैकी एक म्हणजे जंगल. गेल्या कित्येक शतकांपासून जंगल तोडले एवढाच उद्योग माणसाने केला आहे. शेतीसाठी, शहरांच्या वाढीसाठी, कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी, इंधनासाठी, खाणींसाठी, रेल्वे आणि रस्त्यांसाठी अशा नानाविध कारणांसाठी आपण जंगल तोडत राहिलो. त्याचे दुष्परिणाम झोंबू लागले आहेत.

· जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे , आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही.

· ज्या प्रमाणात जंगलतोड होते त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा ऱ्हास होत आहे, जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे. दगडांच्या खाणींमुळे डोंगर-माथेही उजाड होत आहेत. अन् जवळच्या भागातील पर्जन्यमान कमी होत आहे. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि त मानवी वस्त्यांत आसरा शोधात आहेत त्यामुळे महाराष्ट्रात किंवा इतर प्रदेशात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत.

· दिवसेंदिवस होणार्‍या जंगल कटाईमुळे मातीची धूप, वृक्षांची कामरता, पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण, वृक्षअभावी येणारे पूर अशा समस्या जगात जागोजागी भेडसावत आहेत. गतवर्षी केदारनाथला आलेला पूर हा जंगलतोडीचाच परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

· वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत आहे त्यामुळे बाष्पि‍भवनाचे प्रमाण वाढत आहे परंतु पर्जन्यवृष्टी मात्र त्या प्रमाणात होत नाही म्हणून जमिनीवर पाण्याचे साठे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढत नाही ह्या समस्या आज निर्माण झाल्या आहेत.

Answered by preetykumar6666
5

नैसर्गिक आपत्ती:

  • नैसर्गिक आपत्ती ही पृथ्वीवरील नैसर्गिक प्रक्रियेमुळे उद्भवणारी एक मोठी प्रतिकूल घटना आहे; पूर, चक्रीवादळ, वादळ, ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, सुनामी, वादळ आणि इतर भौगोलिक प्रक्रिया ही उदाहरणे आहेत.

  • एक नैसर्गिक आपत्ती ही अशी घटना आहे जी पृथ्वीच्या नैसर्गिक शक्तींमुळे उद्भवते जिथे मोठे नुकसान होते आणि कधीकधी जीवितहानी होते. नैसर्गिक आपत्ती भूकंप आणि त्सुनामीपासून पूर, ज्वालामुखीचा उद्रेक होईपर्यंत, चिखलफेक आणि वन्य अग्निशामकांपर्यंत अनेक प्रकार घेऊ शकतात.

Hope it helped......

Similar questions