विनंती पत्र- तूमच्या शाळेतील इयत्ता ८वीतील ४० विद्याथी एक दिवसाच्या श्री गणेश मूर्ती बनवाने या शिबीरात सहभागी करुन घेण्यासाठी संयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा.( शिबीर दिनांक ०९/०९/२०१९ सोमवार, वेळ : सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० पयँत
स्थळ : निव्यानंद सभागृह शंकर नगर ,पुणे)
Answers
Answered by
6
प्रा राजेश कदम,
संस्कार विद्यालय,
कात्रज, पुणे
दिनांक: ५/९/२०१९
प्रति,
संयोजक अध्यक्ष,
बालमित्र गणेश मित्रमंडळ,
पुणे.
विषय: शाळेतील ४० विद्यार्थींना गणेश मूर्ती शिबिरात सहभागी करण्याचे विनंती पत्र.
माननीय महोदय,
मी प्रा राजेश कदम, संस्कार विद्यालय पुणे या मध्ये मराठी विषय शिकवणारा प्राध्यापक आहे. माझ्या शाळेतील मुलांना गणपती मूर्ती बद्दल अध्याय असल्यामुळे त्यांना त्यात खूप रस येत आहे. तरी ८ वीतील ४० मुले ह्यांना तुम्ही तुमच्या शिबिरात सहभागी कराल ही नम्र विनंती.
शिबिराचे ठिकाण: निव्यानंद सभागृह, शंकर नगर. पुणे (दिनांक : ९/९/२०१९, वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ४)
तरी तुम्ही निश्चितच माझ्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन कराल व मी खात्री देतो की ते आपल्या हाताबाहेर न जाता गैरवर्तन करणार नाहीत.
आपला विश्वासू,
प्रा राजेश कदम
Similar questions