वार्यावरती गंध पसरला नाते मनाचे
मातीमध्ये दरवळणारे हे गांव माझे
जल्लोष आहे आता, उधाणलेला
स्वर धुंद झाला, मनी छेडलेला
शहारलेल्या, उधाणलेल्या, कसे सावरावे
स्वप्नातले गांव माझ्या पुढे
दिवसांचा पक्षी अलगद उडे
फांदीच्या अंगावरती चिमणी ही चिवचिवणारी
झाडात लपले सगे सोयरे
हा गांव माझा जुन्या आठवाचा
नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा
ढगात उरले पाउसगाणे कसे साठवावे
हातातले हात, मन बावरे
खडकाची माया कशी पाझरे
भेटीच्या ओढीसाठी, श्वासांचे झुंबर हलते
शब्दांना कळले हे गाणे नवे
ही वेळ आहे मला गोंदणारी
ही धुंद नाती गंधावणारी
पुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे
Answers
Answered by
0
Answer:
Jehu patadgtcyvrctzebudjdrbf gj
Answered by
1
Answer:
Amazing !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Similar questions