वारकरी पंथाचे कार्य तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answer:
शिवपूर्व काळामध्ये अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर खूप जास्त प्रभाव होता. लोक दैववादाच्या आहारी गेलेले असल्यामुळे लोकांची मानसिक परिस्थिती खूप खचून गेलेली होती. त्यावेळेस महाराष्ट्रातील वारकरी पंथाने लोकांच्या मनात चैतन्य आणण्याचे काम केले.
वारकरी या शब्दाचा अर्थ म्हणजे जो वारी करतो तो वारकरी, अशी व्यक्ती जी दर वर्षी पंढरपुरातील पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाते. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेलेत. त्यांची सुरुवात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी केली. अनेक पंथातील लोक हे एकत्र आले. जसे संत गोरोबा हे कुंभार होते. संत सावता हे माळी होते. संत नरहरी हे सोनार होते.
संत तुकाराम महाराज हे व्यवसायाने वाणी होते. संत नामदेव हे शिंपी होते. संत एकनाथ हे ब्राह्मण होते. वारकरी पंथात स्त्रिया देखील होत्या संत मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यांसारख्या स्त्रिया देखील होत्या. या सर्व संतांचे मुख्य व आश्रयस्थान पंढरपूर होते.
पंढरपूर हे त्यांचे दैवत होते. पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठाशी आहे. भीमा नदी ही चंद्र कोराच्या आकाराप्रमाणे वाहते म्हणून तिला चंद्रभागा असे नाव पडले. असे हे सर्व संत पांडुरंगाच्या भेटीला गेल्यानंतर विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन जायचे.
पंढरपुरात भजन, कीर्तन, सहभोजन या सर्व गोष्टी होत असत. वारकरी पंथाच्या संतांमुळे लोकांना समानतेचा संदेश मिळाला. वारकरी पंथाची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. आजही महाराष्ट्रातील लोक या परंपरेचा सन्मान करतात. लाखोंच्या संख्येने वारकरी हे पंढरपूरला वारी साठी जातात. मात्र वारीमध्ये लोक श्रीमंत-गरीब असा भेदभाव विसरून सर्व विठ्ठलाच्या दारी एकत्र येतात. अशाप्रकारे वारकरी पंथाचे कार्य आजही चालू आहे. लोक वारीत आनंदाने सहभागी होतात.