वारकरी पंथाचा कार्य तुमच्या शब्दात लिहा
Answers
उत्तर :
महाराष्ट्रामध्ये पुजा, कर्मकांडाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात अंधश्रद्धा वाढून त्याचे दुष्परिणाम समाजामध्ये दिसू लागले. समाजातील लोक प्रयत्न न करता दैवावर विश्वास ठेवू लागले. लोक दैववादाच्या आहारी गेले असेही म्हणता येईल. हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा या वाईट परिस्थितीमध्ये आशेचा किरण वारकरी संप्रदायाद्वारे निर्माण झाला. या परिस्थितीवर मात करून समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे,
तसेच समाजात परिवर्तन घडविण्याचे आणि लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले.
पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते तर विठ्ठल हे मुख्य दैवत आहे.
★ अतिरिक्त माहिती :
• वारकरी :- वारकरी संप्रदायामध्ये कोणास काही प्रकारचा भेदभाव मानला जात नाही जसे - स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत इत्यादी.
वारकरी म्हणजे 'वारी करणारा' पंढरपूरला नेहमी वारी करणारा. पंढरपूरला चंद्रभागे किनारी सर्व भाविक जमतात आणि ते मतभेद विसरून किर्तन, भजन व काला करतात. यातून समाजात समतेचा संदेश मिळतो.
★ संतांची नावे -
संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत जनाबाई इत्यादी.