Chinese, asked by rehanakhatoonsiddiqu, 8 months ago

वास समानार्थी शब्द मराठी​

Answers

Answered by farheeneqbal2008
11

Answer:

क्रियापद फॉर्म is the answer.

HOPE IT HELPS!

Answered by hemakumar0116
1

Answer:

गंध समानार्थी शब्द मराठी - वास, दरवळ, सुवास.

Explanation:

गंध समानार्थी शब्द मराठी - वास, दरवळ, सुवास.

वास—पु. १ गंध; परिमळ; पुष्पादिकाचा बरावाईट गंध; दर्प. २ (ल.) झांक; छटा; स्वाद; अंश; सुगावा; खूण; अस्तित्वाचा दर्शक अंश वगैरे. 'तिला क्रोधाचा वास काय आला.' -नारुकु ३.८४. ३ अवशिष्ट अंश; अल्पांश; लेश; किंचितहि भाग. 'विहिरींत पाण्याचा वास नाहीं.' ४ हिंग. (रात्रीचे वेळीं सांकेतिक नांव). [सं. वास् = गंध सुटणें] वास काढणें-घेणें-पाहणें-शोधणें-लावणें-माग काढणें; सुगावा, पत्ता लावणें. वास निघणें-लागणें-पत्ता लागणें; सांपडणें. वास मारणें-दुर्गंध येणें; घाण येणें. वास सुटणें-चांगला वास येणें; सुगंध येणें; दरवळणें; घमघमाट सुटणें. वासाचा-वि. झांक, छटा, रूप. गुण वगैरे असलेला. वासाचें पोतें-न. १ (पदार्थाचा अभाव असून केवळ वास राहिला आहे अशी वस्तु यावरून ल.) श्रीमंती जाऊन गरीब झालेला मनुष्य; गरीब मनुष्य. २ (वास असलेली वस्तु यावरून ल.) श्रीमंत, गबर मनुष्य. वासकट, वासट-वि. १ दुर्गंधयुक्त; घाणेरा; वाईट वास येणारा. २ वाशेरा-ळा पहा. वासन-न. सुवासिक करण्याची क्रिया; गंधयुक्त करण्याची क्रिया; सुगंधित करणें. [सं. वास्] वास- वारा-पु. अत्यंत अल्प अंश; केवळ वास. (निषेधात्मक उपयोग) [वास + वारा] वासळणें-अक्रि. (फळें वगैरे पक्वदशेस आल्यामुळें) गंध पसरणें; दरवळूं लागणें; (पर्याय) वासाडणें. [वास] वासाळ-वि. वाशेरा-ळा पहा. वासित-वि. सुगंधित; सुगंधयुक्त; वास लावलेलें. [वास]

वास—पु. वस्ती;वास्तव्य; रहिवास; राहणें; निवास; मुक्काम; घर; बिऱ्हाड; आश्रय; स्थान. 'असें विदित वास ही मज सदा श्रमींचा करा ।' -केका २२. [सं. वस् = राहणें] वासन-न. १ निवास; वस्ती; रहिवास. २ ध्यानाची स्थिति; आसन. [सं. वस् = राहणें] वासी-वि. वसणारा; राहणारा; वस्ती केलेला. (समासांत) वनवासी; गृहवासी; कैलासवासी; वृक्षवासी. वासु-पु. वास्तव्य; वास पहा. [सं. वस् = राहणें]

वास—स्त्री. १ वाट; मार्ग; प्रतीक्षा. 'आज्ञा कृतांता वास पाहो नए ।' -ऋ ७. 'वास न पाहाती काळदूत ।' -उषा १६५६. 'इहीं आमुची वास पहावीं ।' -ज्ञा ३.१६७. २ चर्या; चेहरा; मुद्रा. 'तंव देवें हास्य केलें उद्धवदेवाची पाहिली वास ।' -धवळेपू ४५.४. 'ऐसें तो क्रिस्ताओ बोलुतु वास पाहे गुरूची ।' -ख्रिपू १.४.३८. ३ क्रम; रीति. -माज्ञा १६. २८७. [सं. वस्]

वास—पुस्त्री. वस्त्र; कपडा. -एभा १२.५३८. [सं. वासस् = वस्त्र] वासित-वि. वस्त्र नेसलेलें; आच्छादित. [सं. वासस्]

#SPJ3

Similar questions