India Languages, asked by BhumikaRawate, 2 months ago

वास्तुकला in marathi

Answers

Answered by lavairis504qjio
1

Answer:

वास्तुकला : (आर्किटेक्चर). वास्तू बांधण्याची कला आणि शास्त्र. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची, गावाची, शहराची, राज्याची, देशाची किंवा खंडाची वास्तुविषयक जडणघडण शैली किंवा स्वरूप, तसेच दर्जा व्यक्त करताना वापरण्यात येणारा शब्दप्रयोग. उदा., भारतीय वास्तुकला, चार्ल्स कोरिया यांची वास्तुकला इत्यादी.

मानवी जीवनात ही अत्यंत उपयुक्त आणि अनिवार्य कला आहे. मानवाच्या ज्या मूलभूत गरजा-अन्न, वस्त्र, निवारा-त्यांपैकी निवारा निर्माण करण्याची कला आणि शास्त्र म्हणजे वास्तुकला. त्यामुळे अतिप्राचीन काळापासून या क्षेत्रात मानव कार्यरत असलेला आढळतो. किंबहुना यामुळेच या कलेला सर्व कलांची जननी मानण्यात येते. ऊन, वारा, पाऊस, तसेच पशू इत्यादींपासून संरक्षण मिळवण्यासाठी निवारा निर्माण केल्यानंतरच मानवाच्या मनात इतर कलानिर्मितीविषयी विचार निर्माण झाले. वास्तुकलेनेच कालौघात इतर संलग्न दृश्य कलांना जन्म दिला. ⇨चित्रकला, ⇨

शिल्पकला, ⇨स्थलशिल्प (लँडस्केप आर्किटेक्चर) इ. त्यांपैकी प्रमुख मानण्यात येतात. सर विन्स्टन चर्चिल यांनी या कलेचे वर्णन ‘प्रथम आपण वास्तू घडवितो आणि मग त्या आपल्याला घडवितात’, असे केले आहे. संस्कृतनिर्मितीच्या प्रक्रियेत जगाच्या इतिहासात प्रथम वास्तुनिर्मिती झाली आणि मग सांस्कृतिक संचित परिपक्व होऊन इतिहास निर्माण झाला. या कलेस ‘सुप्त संगीत’ ही मानले जाते. कारण संगीत हा कालाशी बांधलेला रचनाकल्प असतो तर वास्तुकला हा अवकाशरचनेने निर्माण केलेला संगीतमय आविष्कार असतो. संगीत ही श्राव्य अनुभूती देणारी कला आहे तर वास्तू ही दृक् संवेदनांना संगीतमय करणारी कला मानली जाते. आकार स्थिर असले, तरी त्यांच्या प्रवाही रचनाघटकांद्वारे ते गतिमानतेचा आभास निर्माण करू शकतात. दृक् संगीताची अनुभूती आणून देऊ शकतात.

वास्तूला कलापूर्णता येण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक असते. माणसाने बांधलेली कोणतीही अथवा प्रत्येक वास्तू ‘वास्तुकला’ मानली जात नाही. कोणत्याही बांधीव आकाराला ‘वास्तुकला’ म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी काही मूलभूत निकष पार करावे लागतात. ते म्हणजे – (१) ज्या कार्यासाठी ती वास्तू बांधली आहे त्या वापरातील वास्तूची उपयुक्तता, सोय (२) वास्तूच्या बांधकामातील भक्कमपणा आणिटिकाऊपणा (३) कार्यानुरूप कल्पक अवकाशरचनेची अभिव्यक्ती (४) देखभालीचा कमीत कमी व्याप (५) वास्तूची कार्यानुरूप चैतन्यवृत्ती (स्पिरिट) जागृत ठेवणारे अंतर्बाह्य अलंकरण (६) बांधीव आकार व अवकाश-सौंदर्य यांतील सुयोग्य मेळ. यांतील फक्त अलंकरण कालानुरूप बदलू शकते. परंतु बाकी निकष शाश्वत असतात. प्रत्येक दर्जेदार वास्तुनिर्मितीत हे निकष प्रत्ययाला येतात व म्हणूनच अशा इमारतीला ‘वास्तुकला’ मानले जाते. उदा., एखाद्या कारखान्याच्या आकाराचे देऊळ बांधले, तर ते देऊळ म्हणून अयोग्य वाटते. वेरूळचे ⇨कैलास लेणे आणि एखाद्या गावातील सरकारी शाळेची इमारत ह्या दोन्ही वास्तूच परंतु कैलास लेणे हे वास्तुकला म्हणून गणले जाते, तर शाळेची वास्तू साधी इमारत मानली जाते. याचा अर्थ असा नव्हे, की शाळेची इमारत ‘वास्तुकला’ होऊ शकत नाही. छोटीशी झोपडीदेखील ‘वास्तुकला’ होऊ शकते. सर्जनशील वास्तुतज्ञाने आपल्या क्रियाशीलतेची कार्य, उपयुक्तता व सौंदर्य या वास्तुशास्त्रीय निकषांशी सांगड घालूनवास्तुनिर्मिती केली, की वास्तुकला निर्माण होते. वास्तुनिर्मिती केली, की वास्तुकला निर्माण होते.

Answered by Anonymous
0

Answer:

hope this is helpful for you

Attachments:
Similar questions