Art, asked by sawanmeshram03, 1 month ago

वासल्या भावनेतून आनंदची अनुभूति येते?

Answers

Answered by srnroofing1717
0

Answer:

ललित आणि वैचारिक साहित्यातून विलक्षण अनुभव मिळतात. ते वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते वाचल्यावर वाचकांच्या मनावर काही ना काही परिणाम होतोच. त्या पुस्तकातून भोवतालच्या परिस्थितीचे दर्शन घडते. त्यातल्या दुःखद घटनांनी वाचकांचे हृदय पिळवटून जाते. त्या परिस्थितीतील दुःखाची जाणीव होते. ही अशी स्थिती वाईट आहे. ती तशी असता कामा नये. ती बदलली पाहिजे. असे विचार मनात येतात. मग माणसे ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतात. नवीन चांगली स्थिती आणण्याच्या विचारांना पाठिंबा देतात.

उदाहरणार्थ, दया पवार यांचे 'बलुतं' हे आत्मकथनात्मक पुस्तक पाहा. यात दलित समाजाचे अत्यंत हीनदीन अवस्थेतील चित्रण केलेले आहे. हे वाचल्यावर वाचकाला दुःख होते. संतापही येतो. मग जातीयता, धर्मांधता या तत्त्वांविरुद्ध त्याच्या मनात तिडीक निर्माण होते. याचा अर्थ 'बलुतं' हे पुस्तक माणुसकी ची बाजू घेतो. गुलामगिरी विरुद्ध, अन्यायाविरुद्ध ते पुस्तक माणसाला लढायला प्रवृत्त करते. म्हणजे अशी पुस्तके माणसाला चांगले जग निर्माण करण्याची प्रेरणा देतात.

Explanation:

\huge\colorbox{cyan}{Thank you}

Similar questions