India Languages, asked by mileshparit1976, 4 months ago

वैशिष्ट्ये लिहा
महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये​

Answers

Answered by Anonymous
8

Explanation:

कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील सर्व शासकीय सक्रियता आणि उपक्रमांविषयीचे नियमन आणि दिशादर्शन ज्याद्वारे केले जाऊ शकते असा सार्वजनिक धोरणाचा दस्त म्हणजे सांस्कृतिक धोरण असे थोडक्यात म्हणता येईल. इसवी सन २००९ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचा प्रयत्न प्रथमच करण्यात आला.

Answered by geetakhamkar
5
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष आ.ह. साळुंखे तर उपाध्यक्ष दत्ता भगत आहेत. राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे सचिव अजय अंबेकर समितीचे सदस्य सचिव आहेत. याशिवाय, उपाध्यक्ष दत्ता भगत, उल्हास पवार, डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो, वि. वि. करमरकर, डॉ. अरुण टिकेकर, अशोक नायगावकर, गिरीश गांधी, शफाअत खान सदस्यांचा समितीवर समावेश होता.

या समितीने जानेवारी २०१० मध्ये, तिला यासाठी दिलेली मुदत पूर्ण होण्याआधीच, सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार करून राज्य शासनाला सादर केला. त्यानंतर तो खुला करण्यात आला आहे. त्याची पीडीएफ स्वरूपातली प्रत महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर चर्चेकरिता उपलब्ध करण्यात आली . सांस्कृतिक जीवनाशी निगडित शक्यतो सर्व बाबींचा समावेश या मसुद्यात करण्यात आला असल्याची माहिती मसुद्यात सुरवातीलाच देण्यात आली आहे. मसुद्यानुसार या धोरणाची १४ पायाभूत तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत.

सांस्कृतिक जगताशी निगडित शक्यतो सर्व बाबींचा समावेश या धोरणात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे धोरण तयार करताना या संदर्भात शासनाने आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आलेले मुद्दे, वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या सूचना, व्यक्तीगत, संस्थांच्या सूचना तसेच विविध माध्यमाद्वारे समितीकडे व्यक्त करण्यात आलेल्या अपेक्षा यांचाही विचार करण्यात आला [१]

सोमवार, ७ जून, २०१० रोजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.




If helpful please mark me brain list
Similar questions