२. विश्व कोशाची निर्मिती प्रकिया
Answers
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधीन असलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी मराठी विश्वकोश कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी राज्यकारभारासंबंधी मूलभूत धोरण सूचित करणारी काही सूत्रे सांगितली. त्या सूत्रांनुसार मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृदधीसाठी राज्य शासनाने दिनांक 19 नोव्हेंबर 1960 रोजी कै. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. या मंडळाने जे अनेकविध उपक्रम सुरू केले, त्यांपैकी एक प्रमुख व वैशिष्टयपूर्ण उपक्रम म्हणजे मराठी विश्वकोशाची निर्मिती होय. दिनांक 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन व प्रकाशन कार्यार्थ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या राज्यस्तरीय मंडळाची स्थापना करण्यात आली.