India Languages, asked by vinodsingh7225, 3 months ago

विश्वकोशाचे ----- खंड प्रसिद्ध आहेत.​

Answers

Answered by gurpreetkang280
23

Answer:

विश्वकोशाचे प्रकार : विश्वकोशाचे अनेक प्रकार आहेत. ज्ञानविज्ञानांच्या सर्व शाखांतील अद्ययावत माहितीचे संकलन साररूपाने विविध नोंदीतून देणाऱ्या विश्वकोशांना ‘सर्वविषयसंग्राहक विश्वकोश’ असे म्हटले जाते. स्थूल मानाने सर्वसंग्राहक विश्वकोशाचे दोन रचनाप्रकार आढळतात : (१) ज्ञान-विज्ञानांच्या सर्व शाखांशी संबंधित अशा विविध नोंदी नियोजित संख्येच्या खंडांतून अकारविल्हे देणारा विश्वकोश. अशा विश्वकोशात अंक (लिपिप्रकार /गणित), अंकाई-टंकाई (भूगोल), अंकित राष्ट्रे (राज्यशास्त्र), अंकुरण (वनस्पतिविज्ञान) ह यांसारख्या वेगवेगळया विषयांशी निगडित असलेल्या नोंदी, त्यांचा वर्णानुक्रमे वा अकारविल्हे जो क्रम ठरेल, त्या क्रमानुसार येतात. उदा., एन्साय्‌क्लोपीडिआब्रिटानिका, एन्साय्‌क्लोपीडिआअमेरिकाना, कोलिअर्स एन्साय्‌क्लोपीडिआ चेंबर्स एन्साय्‌क्लोपीडिआ आणि द वर्ल्ड बुक एन्साय्‌क्लोपीडिआ हे पश्चिमी देशांतील काही विख्यात विश्वकोश. मराठीतील उदाहरणे द्यावयाची, तर ⇨ श्रीधर व्य कटेश केतकर (१८८४-१९३७) ह यांचा मह्याराष्ट्रीय ज्ञानकोश (२३खंड १९२०-१९२९) आणि तर्कतीर्थ ⇨ लक्ष्मणशास्त्री जोशी संपादित मराठी विश्वकोश ( प्रकाशित खंड १५, १९७६-१९९५) ह यांची देता येतील. हे अनेक खंडी आहेत. तथापि असे सर्वसंग्राहक विश्वकोश अवघ्या एका खंडाचेही असू शकतात : उदा., विल्यम एच्. हॅरिस आणि जुडिथ एस्. लेव्ही संपादित द न्यू कोलंबिया एन्साय्‌क्लोपीडिआ (१९७५). सर जॉन समरस्केल ह यांनी संपादिलेला ह या प्रकारातला एक खंडी विश्वकोश द पेंगविन एन्साय्क्लोपीडिआ (१९६५)- तर अवघ्या ६४७पृष्ठांचा असून ह याचा आकारही लह्यान आहे. डेव्हिड क्रिस्टलसंपादित केंब्रिज पेपरबॅक एन्साय्‌क्लोपीडिआ (१९९३ ९६५पृष्ठे) ह याचाही उल्लेख करता येईल.

Answered by salonimahad
0

विश्वकोशाचे --20--- खंड प्रसिद्ध आहेत.

Similar questions