History, asked by truptibobade12, 2 days ago

३) विश्वकोशाचे महत्व स्पष्ट करा.

Answers

Answered by adesaloni03gmailcom
10

Explanation:

विश्वकोशाचे प्रकार : विश्वकोशाचे अनेक प्रकार आहेत. ज्ञानविज्ञानांच्या सर्व शाखांतील अद्ययावत माहितीचे संकलन साररूपाने विविध नोंदीतून देणाऱ्या विश्वकोशांना ‘सर्वविषयसंग्राहक विश्वकोश’ असे म्हटले जाते. स्थूल मानाने सर्वसंग्राहक विश्वकोशाचे दोन रचनाप्रकार आढळतात : (१) ज्ञान-विज्ञानांच्या सर्व शाखांशी संबंधित अशा विविध नोंदी नियोजित संख्येच्या खंडांतून अकारविल्हे देणारा विश्वकोश. अशा विश्वकोशात अंक (लिपिप्रकार /गणित), अंकाई-टंकाई (भूगोल), अंकित राष्ट्रे (राज्यशास्त्र), अंकुरण (वनस्पतिविज्ञान) ह यांसारख्या वेगवेगळया विषयांशी निगडित असलेल्या नोंदी, त्यांचा वर्णानुक्रमे वा अकारविल्हे जो क्रम ठरेल, त्या क्रमानुसार येतात. उदा., एन्साय्‌क्लोपीडिआब्रिटानिका, एन्साय्‌क्लोपीडिआअमेरिकाना, कोलिअर्स एन्साय्‌क्लोपीडिआ चेंबर्स एन्साय्‌क्लोपीडिआ आणि द वर्ल्ड बुक एन्साय्‌क्लोपीडिआ हे पश्चिमी देशांतील काही विख्यात विश्वकोश. मराठीतील उदाहरणे द्यावयाची, तर श्रीधर व्य कटेश केतकर (१८८४-१९३७) ह यांचा मह्याराष्ट्रीय ज्ञानकोश (२३खंड १९२०-१९२९) आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी संपादित मराठी विश्वकोश ( प्रकाशित खंड १५, १९७६-१९९५) ह यांची देता येतील. हे अनेक खंडी आहेत. तथापि असे सर्वसंग्राहक विश्वकोश अवघ्या एका खंडाचेही असू शकतात : उदा., विल्यम एच्. हॅरिस आणि जुडिथ एस्. लेव्ही संपादित द न्यू कोलंबिया एन्साय्‌क्लोपीडिआ (१९७५). सर जॉन समरस्केल ह यांनी संपादिलेला ह या प्रकारातला एक खंडी विश्वकोश द पेंगविन एन्साय्क्लोपीडिआ (१९६५)- तर अवघ्या ६४७पृष्ठांचा असून ह याचा आकारही लह्यान आहे. डेव्हिड क्रिस्टलसंपादित केंब्रिज पेपरबॅक एन्साय्‌क्लोपीडिआ (१९९३; ९६५पृष्ठे) ह याचाही उल्लेख करता येईल.

(२) सर्वसंग्राहक विश्वकोशांचा दुसरा प्रकार म्हणजे एकाच योजनेखाली एकेका विषयासाठी वा विषयगटासाठी एकेक स्वतंत्र खंड मुक्रर करून त्या-त्या विषयाशी वा विषयगटाशी संबंधित अशा नोंदी त्या खंडात अकारविल्हे देणे. उदा., ऑक्सफर्ड ज्यूनिअर एन्साय्‌क्लोपीडिआ (१२खंड व सूचीचा १३वा खंड १९४८ - १९६४). ह या विश्वकोशाचा प्रत्येक भाग ह्या‘प्रकृतिविज्ञान’, ‘कला’, ‘विश्व’, ‘कृषी आणि मत्स्योद्योग’ अशा एकेका विषयाला वा विषयगटाला वाहिलेला आहे. अशी रचना असलेल्या कोशांचा एक फायदा असतो. ज्याला ज्या विषयात वा विषयगटात स्वारस्य असेल, त्याला त्या विषयाला वा विषयगटाला वाहिलेला खंड सोयीने पाहता येतो. पहिल्या प्रकारातल्या विश्वकोशात मात्र अशा वाचकाला त्याच्या जिज्ञासेच्या विषयातील नोंदी त्या विश्वकोशाच्या विविध खंडांत अकारविल्हे जशा विखुरलेल्या असतील तशा पाह्याव्या लागतात.

Answered by 9765657456
1

Answer:

विश्वकोशाचे महत्व स्पष्ट करा

Explanation:

कोशात अंतर्भूत असलेल्या विषयांवरील जे ज्ञान उपलब्ध असेल, ते संकलित करून वस्तुनिष्ठ आणि स्थूल परिचयाच्या स्वरूपात शक्य तितक्या सुबोधपणे जिज्ञासू वाचकांपर्यंत पोहोचविणे हे विश्वकोशाचे कार्य होय.

Similar questions