विषय विज्ञान व तंत्रज्ञान प्र १) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.१) ध्वनी म्हणजे काय?
Answers
Answer:
१. आवाज किंवा ध्वनी म्हणजे एखाद्या माध्यमातून कानाद्वारे कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी उर्जेचा एक प्रकार आहे.
२. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात.
३. माणसाला ऐकण्याच्या क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते.
४. आपले कान २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतात.
Answer:
ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते ही ऊर्जा तरंगाच्या स्वरूपात असते ध्वनीप्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी तरगामुळे माध्यमात सपिडन (अधिक घन क्षेत्र) व विरलन (कमी घनतेचे क्षेत्र) याची शृंखला निर्माण होते. माध्यमाच्या कणांचे दोलन आपल्या मध्य स्थितिच्या आजूबाजूस तरंग प्रसारणाच्या समातर दिशेने होते, अशा तरगाना अनुत्तरंग (Longitudinal Waves) म्हणतात. याउलट पाण्यात खडा टाकल्याने निर्माण होणाऱ्या तरंगात पाण्याचे कण वर खाली दोलन करतात. हे दालन तरंग प्रसारणाच्या दिशेच्या लबवत असतात, त्यास अवतरण (Transverse Waves) असे म्हणतात.