विषय- वर्गात असताना तुमच्या परिसरात जोरदार पाऊस होत आहे . या जोरदार पावसामुळे शाळेला सुट्टी देण्यात येत आहे . या विषयावर तुमच्या शब्दात १० ते १५ ओळींचा निबंध लिहा.
Answers
Answer:
लाॅकडाऊन"
गरीबीच्या पिंजऱ्यात डोकावणार्या, स्वप्नांच्या दुनियेतून येणार्या किरणाच्या आशेवर एका नवरा बायकोच्या संसाराच गाड उत्तर-प्रदेशातून मुंबईमध्ये प्रवेश करत. विजय आणि इरावती त्यांच नाव. नुकतच लग्न झालेले जोडपं. पाचवीला पुजलेली कपाळावरची रेषा पुसून त्यावर सुखाची चंद्रकोर लावण्याचं स्वप्नं डोळ्यात घेऊन दोघांनी मुंबईमध्ये पाऊल ठेवलं.
मुंबईत आल्यावर त्यांचा नवीन जन्मच झाल्याचा आभास त्यांना झाला. भाषा ही त्यांच्यासाठी पहिली पायरी होती. तस लोकं हिंदीमध्ये बोलत होते, पण दोघेही अबोल स्वभावाचे असल्यामुळे लोकांशी बोलायला अगदीच चाचरत होते. दोन रात्र स्टेशनवरच काढल्यावर तिथल्याच एका चहाची टपरी असलेल्या रहीम चाचा बरोबर त्यांची ओळख झाली. त्यांनी रहीम चाचाकडे कुठे काम मिळेल का यासाठी विनवणी केली. शिक्षणाची पाटी कोरी असल्यामुळे कष्टाचं गाठोड कंबरेला बांधण्याची दोघांचीही तयारी होती. रहीम चाचानी अापल्या मळकट हातांनी ठिगळं लावलेल्या शर्टाच्या खिशातून मोबाईल काढला आणि काहीतरी नंबर फिरवला. "लोखंड गोळा करण्यासाठी कचऱ्यातून लोहचुंबक फिरवल्यावर जस लोखंड एकमेकांना चिटकत त्याचप्रमाणे परिस्थितीला गरीब माणसं चिटकून असतात". दोन-तीन नंबर फिरवून एका ठिकाणी इमारतीच्या बांधकामासाठी कामगारांची गरज आहे अस समजल. दोघांनीही क्षणात माना डोलावल्या. चाचाचे आभार मानून दोघे निघाले.
इरावतीच्या डोळ्यात अजूनही त्या मोबाइलची फ्लॅश लाइट चमकत होती. विजयनेही आपण लवकरच मोबाइल घेऊ असं बोलून तिच्या चेहऱ्यावर हसू आणलं. दोघेही कामाच्या ठिकाणी पोहोचले. तिथल्या मुकादमाने इमारतीच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या खोलीत राहण्याची परवानगी दिली आणि कामाला रुजू होण्यासाठी सांगितल. इमारतीच सत्तर टक्के काम झालं होतं. शेवटच्या काही मजल्यांवरच काम चालू होतं. एक दिलासा देणारी बाब म्हणजे तिथे काम करण्यार्यांपैकी बरेच लोक त्यांच्याच उत्तर प्रदेशातले होते. पंधरा-वीस दिवस झाले. सर्व काही सुरळीत चालू होतं. एक दिवस अचानक लोकांमध्ये कुजबूज चालू झाली, काहीतरी रोग आल्याच्या गोष्टी करत होते. सगळ काही बंद कराव लागेल असही बोलत होते. विजय आणि इरावतीने मात्र ठरवलं होतं आता काही झालं तरी माघार घ्यायची नाही. दोन-तीन दिवसांनी तिथे काम करणाऱ्या कामगारांची संख्या कमी होऊ लागली. जो तो आपला गावी; घरी जाऊ लागला. एक दिवस असा उजाडला त्या दिवशी कोणीही कामावर आलं नव्हतं. त्यांचा मुकादम ही आला नव्हता. मोदींनी लाॅकडाऊन घोषित केलं होत. मोदींचा तो संदेश यांच्या पर्यंत पोहोचेल असा कोणताच मार्ग नव्हता. सगळ काही अचानक घडल होत. दोघांना याची काहीच कल्पना नव्हती. प्रामाणिकपणे त्या दोघांनी कामाला सुरुवात केली. थोड्यावेळाने तिथे एक पोलिसांची गाडी आली. पोलीस त्यांच्यावर वरच्या आवाजात ओरडू लागले. पण त्यांना काही समजत नाही हे जाणून त्यांनी हिंदी मध्ये त्यांना घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि पंधरा एप्रिलपर्यंत घरातच बसून राहण्याचा सल्ला दिला. आता मात्र दोघे पुरते घाबरले. पंधरा नंतर आपणही घरीच गेलेल सोयीस्कर ठरेल असा दोघांचा निकष निघाला. दिवसाच्या संध्याकाळी त्यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळत असल्याने त्यांच्याकडे तीन-चार हजार जमले होते. परतीच्या प्रवासाच्या तिकीटाचे दीड हजार बाजूला ठेवून त्याने बाकीच्या पैशांचा किराणा घेतला. आता पंधरा दिवस कोणीच नाही म्हणून त्यांनी इमारतीमध्येच एका घरात राहण्याचं ठरवलं. काही दिवसांसाठी का होईना ते चार भिंतींच्या श्रीमंतीत जगणार होते. दिवसामागून दिवस उलटत होते. रस्त्यावरचा शुकशुकाट, पक्ष्यांची किलबिल या गोष्टी त्यांना त्यांच्या गावाची आठवण करून देत होत्या. रस्त्यावरून फिरणाऱ्या लोकांचा पोलिसांकडून घेतलेला समाचार दोघे हसत बघत बसायचे.
बघता बघता पंधरा तारीख आली. दोघांनीही आपला बस्ता बांधला आणि स्टेशनच्या दिशेने निघाले, पण चौकात जाताच त्यांना पोलिसांनी अडवलं. आजार काही गेला नाही. त्यामुळे बंद अजून ३ मे पर्यंत वाढवला असल्याच पोलिसांनी त्यांना सांगितल. दोघांनी निराश मनाने पावलं मागे घेतली. पण आता विजयच्या डोळ्यात निराशेबरोबर भीती दाटून आली होती. आता उरलेल्या पैशात किती दिवस पोट भरायच याच गणित डोक्यात मांडू लागला. काही पावलं पुढे गेल्यावर त्याने ईरावतीला तिथेच उभ करून पोलिसांकडे पुन्हा धावत गेला आणि तीन मे नंतर खरंच बंदी संपेल का याची चौकशी करू लागला. पोलिसांनी दिलेला खोटा धीर विजयने ओळखला आणि बायकोला घेऊन माघारी निघाला. जाताना दोघांनीही उरलेल्या पैशातून किराणा घेतला. परिस्थितीची जाणीव इरावतीलाही होती. ती हा किराणा आपण वीस दिवस कसा पुरवायचा याचं समिकरण विजयला समजावून सांगत होती. विजयला मात्र उपासमारी आत्ताच दिसू लागली होती. एकाच वेळेच जेवण बनवून दिवस काढायचे असं दोघांनी ठरवलं.
तिकडे गरजूंसाठी सरकार आणि अनेक सामाजिक संस्था फुकट अन्नधान्य पुरवत होते. पण त्यांच्या इमारतीच्या आजूबाजूचा परीसर श्रीमंतांनी वेढला असल्याने ही दोन गरिबीची रोपं कुणाला दिसलीच नाहीत.
पुरेसा दिसणारा किराण विजयला दोन तीन दिवसांतच खूप कमी होत असल्यासारख वाटू लागलं. त्याच्या मनात आता आत्महत्येचा विचार येऊ लागला. एक जीव जर कमी झाला तर नक्कीच दुसऱ्यावर उपासमारीची वेळ येणार नाही असा गैरसमज त्याच्या डोक्यात घर करु लागला. दुपारी इरावती झोपली असताना त्याने मेडिकलमधून उंदर मारण्याचं औषध; "रॅट किल" आणलं. आधी त्याने विचार केला जेवणाच्या ताटात विष टाकू, पण बायकोसमोर जीव गेला तर तीला बघवणार नाही. म्हणून त्याने तो मार्ग टाळला आणि रात्री इरावती झोपल्यावर विष घेण्याच ठरवलं. रात्री जेवण झाल्यावर दोघेही नेहमीप्रमाणे बाल्कनीमध्ये बसले. थोड्यावेळाने त्यांना जाणवलं लोक घरातली लाईट बंद करून पणत्या,मेणबत्त्या लावत आहेत.
mark my answer as brainliest and follow me
शाळेचा पहिला दिवस पावसात
आणखी महत्त्वाच्या बातम्या
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल
राजकीय तिढा सुटला; शिवसेनेने मानले काँग्रेसचे आभार
मटका किंग रतन खत्री यांचे निधन
दोन महिन्यांच्या सुट्टय़ा संपल्यानंतर मंगळवारपासून राज्य शासनाशी संलग्नित शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांचा पहिलाच दिवस पावसाने गाजवला. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस दुपापर्यंत चांगलाच बरसत होता. त्यामुळे सकाळी आणि दुपारच्या सत्रातील मुलांनी पावसाचा आनंद घेतला.
विदर्भात दरवर्षी २६ जूनला शाळा उघडतात. यावेळी २६ जूनला रमजान ईद आणि २५ जूनची रविवारची सुट्टी अशी उलटी गिनती करून शाळा सुरू होण्याच्या दिवसाची विद्यार्थी वाट पाहत होते. सकाळीच पालकांनी मुलांची तयारी करून दिली मात्र, पावसामुळे शाळेपर्यंत पोहोचता आले नाही. पाऊस आता थांबेल नंतर थांबेल म्हणेस्तोवर पाऊस पडतच राहिला. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या शाळा सकाळी ७.३० वाजता होत्या, त्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. पालक सोडवायला आले आणि त्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांची भेट घेऊन संवाद साधला. मात्र, ११.३० वाजता पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलांसाठी अडचणीचे गेले. स्कूल बस घरापर्यंत जाऊनही पालकांनी धो धो पावसात मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे अर्धीअधिक मुले शाळेत येऊच शकली नाहीत. घराजवळ शाळा असलेल्या विद्यार्थ्यांनी मात्र छत्री, रेनकोटचा आधार घेत पावसातच शाळा गाठली. पालक नाही म्हणत असतानाही शाळेच्या ओढीपायी काही मुलांनी भिजत का होईना शाळेत जाण्याचा हट्ट पालकांजवळ धरल्याने त्यांना मुलांना शाळेत पोहोचते करावे लागले. एकंदरीत मुलांचा शाळेचा पहिला दिवस पाण्यात गेला. मात्र, जी मुले शाळेत आली त्यांचे गुलाबाचे फूल, चॉकलेट देऊन शाळांनी स्वागत केले.
अनेक शाळांच्या प्रांगणात पाणी साचले. अनेक ऑटो मध्येच बंद पडल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास विलंब झाला. अनेक पालक छत्री घेऊन मुलांना सोडायला व घ्यायलाही आले होते. त्यांचीही चांगलीच तारांबळ उडाळी.