India Languages, asked by abhaysorate888, 7 months ago

"वाट पाहताना" या पाठात मुलाची वाट पाहणा-या अंध आईचा आनुभव तुमच्या शब्दात कथण करा

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

         'वाट पाहताना' या पाठात लेखिका अरुणा ढेरे यांनी एक अंध आईचा वाट पाहण्याचा प्रसंग रेखाटला आहे.

Explanation:

        वाट पाहताना हा सुप्रसिद्ध लेखिका अरुणा ढेरे यांचा पाठ आहे. लेखिकेने या पाठात वाट पाहताना चे अनेक अनुभव वैविध्यपूर्ण पद्धतीने स्पष्ट केले आहेत. वाट पाहण्याचा अनुभव हा कधी सुखद तर कधी दुःखद असतो.

         एका अंध आईचा आपल्या मुलासाठी वाट पाहण्याचा अनुभव हा अतिशय भावनिक रीत्या लेखिकेने सादर केला आहे. खरतर त्या अंध आईचा मुलगा हा शहरांमध्ये राहतो. आणि तो मुलगा कधीतरी परत येईल या आशेवर ती जगत असते. म्हातारपणामुळे आणि एकटेपणामुळे तिच्या आयुष्यातील हे शेवटचे दिवस आपला मुलगा कधीतरी परत येईल व आपल्याजवळ राहील या आशेवर आनंदात जात होते.

        खरतर तिला हे माहीत नव्हते की तिचा मुलगा हा तिला कधीही पत्र पाठवत नव्हता किंवा तो कधीही परत येणार नव्हता. फक्त ती आनंदी राहावी यासाठी पोस्टमन खोटे खोटे का होईना पत्र वाचून दाखवत होता. म्हातारपणात आपला मुलगा आपल्याला सोडून कायमचा गेला आहे हे दुःख तिला कधीही सहन होणारे नव्हते. म्हणून प्रत्येक वेळेला त्याला येता येत नसले तरी पत्र पाठवत असतो या आनंदातच ती आयुष्यातील शेवटचे दिवस जगत होती. लेखिकेने खूप छान शब्दात त्या अंध आईचा भावनिक प्रसंग रेखाटला आहे.

Similar questions
Math, 11 months ago