CBSE BOARD X, asked by gaikwadbappu33, 9 months ago

`वाट पाहताना' या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा​

Answers

Answered by pragna15
15

Explanation:

सातवीला असताना अरुणाताईंचा धडा होता एक मराठीच्या पुस्तकात- 'वाट पाहताना..' या शीर्षकाचा.

फार फार आवडायचा तो मला. तेव्हा कळतही नव्हतंच तितकं तरीपण छान वाटायचं. नंतर मोठी होत गेले तसे एकेक कवडसे कळत गेले या वाट पाहण्याचे आणि तेच निरखणं जास्त मोहक वाटायला लागलं.

खरंच लहानपणापासून आपण वाट पाहतच असतो ना कशाकशाची.. म्हणजे अगदी लहानपणी आईच्या कामं संंपवून कडेवर घेण्यापासून सुरुवात होते या वाट पाहण्याची ती साथ करतच राहते आयुष्यभर सोबत बनून . परीक्षेची वाट बघताना पोटातले भीतीचे अन् धाकधुकीचे गोळे आणि नंतर सुट्टीची वाट बघताना विरघळत जाणारा जीव आता आठवत राहतो. सायीच्या मायेचा एक चिमुकला गाव तिथे वाट बघत असायचा रोज. असा गाव आहे आपल्याकडे ही जाणीव फार श्रीमंत करून जायची साध्या फ्रॉकवालीलासुद्धा!

मी पुस्तकांची हावरी! हातात येईल ते पुस्तक अधाशासारखं संपवणं हा उद्योग जिवाभावाचा. माझ्यासाठी की काय म्हणून अण्णा कितीतरी पुस्तकं घेऊन ठेवायचे नेहमी.

अशी पुस्तकं हातात येण्याचीही वाट बघावी लागते..

दुपारनंतर उंबर्‍यावर बसून संध्याकाळ होण्याची वाट बघत राहायची मी. काही विशेष नसलं तरी. तिचे रंग वेड लावणारे असायचे - आजही कायम असतात!

वय वाढत जातं तसे वाट पाहण्याचे आयामही बदलत जातात नकळत.

सकाळी सकाळी लवकर आवरून बस ची वाट पाहतानाची धाकधूक, संध्याकाळी दिवसभराची काजळी उरात साठवून घरी पोहचण्याची वाट पाहतानाचा थकवा.

तीच संध्याकाळ जेव्हा क्षितिजावर ठळक टिळा मिरवून जाणार असते कुंकूभरल्या तेजाचा तेव्हा जिवाभावाच्या मैत्रिणीसारखं आसुसून तिची वाट पाहणं.

फार फार बोलायची इच्छा असताना फक्त समोर हवी ती व्यक्ती नाही म्हणून हिरमुसणं आणि तरीही तिच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून वाट बघत राहणं, त्या व्यक्तीशी काहीच संपर्क नसताना तिच्या खुशहाल वगैरे असण्याच्या बातमीची वाट पाहणं. तिच्या येण्याची बातमी कळली की वाट पाहताना होणार्‍या भासांची वाट पाहणं. एकट्या रात्रीचा काळोख संपून पहाटेच्या धूसर चाहुलींची वाट पाहणं. त्या पहाटेची पावलं ओळखून येणाऱ्या कितीतरी छोट्या छोट्या स्वप्नांची वाट पाहणं. आजूबाजूला दाट धुकं असताना ते आपल्याचसाठी म्हणून हातानंच मिटवणार्‍या व्यक्तीची जागेपणी वाट पाहणं.

Answered by arnavjaiswal13579
4

Answer:

अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना हा अत्यंत हृदय ललितलेख आहे .जीवनातील एक मूलभूत महत्त्वाचे तत्त्व या लेखात त्या उलगडून दाखवतात. तसे पहिले तर माणूस वाट पाहत असताना वाटचाल करीत असतो .प्रत्येक पावलावर त्याच्या मनात "नंतर काय होईल ?","माझं स्वप्नाप्रमाणे, कल्पनेप्रमाणे घडेल की नाही?" अशी तगमग असते .हीच तर मग त्याला पुढे जायला, जीवन जगायला शिकवते ते तत्व लेखिकांनी अनेक उदाहरणांद्वारे स्पष्ट केले आहे सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहात अनेक अनोळखी प्रदेश माणसे प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते उंबराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांचे थवे यामुळे हिरवेगार बनलेले ते झाड पाहून लेखिकांचे मन हळवे कोमल होऊन जाते त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुसतात वाट पाहण्यात ने त्याची निर्मन शीलता जागृत होते त्याची वाट पाहताना त्यांचे मन अस्वस्थता आणि अनामिक भीती यांनी भरून जाते या सर्वात जगण्याचा अनुभव होता अस्वस्थता हुरहुर दुःख तगमग शंकाकुलता हे सारे भाव मला भेटलेली म्हातारी तसेच शेतकरी वारकरी भक्त यांचे चेहऱ्यावर लेखिकांना गवसतात अशाप्रकारे जगण्याच्या मुळाशी हीच वाट पाहण्याची भावना असल्याचे भान लेखिका या लेखातून वाचकांना देतात म्हणून वाट पाहताना हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.

Similar questions