Hindi, asked by chandramanigondane12, 6 months ago

वृत्तांतलेखन
तुमच्या शाळेत साजरा झालेल्या स्वातंत्र्यदिनाचा वृत्तांत 60 ते 30 शब्दांत लिहा.​

Answers

Answered by trishawath
4

Answer:

आज 15 ऑगस्ट ! शाळेत त्या निमित्ताने स्वातंत्र्यदिन साजरा झाला. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक आणि मुख्याध्यापक या सोहळ्यासाठी सकाळपासून हजर होतो . सुप्रसिद्ध नेमबाजी राही सरनोबत यांना निमंत्रित केले होते . त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. आम्ही सर्वांनी समूह गीते गायली . मी स्वातंत्र्यदिनाची गोष्ट सांगितली . सगळ्यांना ती गोष्ट खूप आवडली.

प्रमुख पाहुणे राही सरनोबत यांनी देशासाठी बलिदान करणार्यांना श्रद्धांजली वाहिली .त्या म्हणाल्या, " तुमचे धेय्य निश्चित करा .उत्तम अभ्यास करा .व्यायाम करा .आरोग्य सांभाळा .भारताचे जबाबदार नागरिक बना" . त्यांचे विचार मला खूप आवडले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान दिलेल्या महान शहीदांबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी असेही म्हटले की स्वातंत्र्य अत्यंत मौल्यवान आहे आणि ते जतन करणे अतिशय आवश्यक आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात खूप महत्त्व असते. आज प्रत्येक दिवशी आम्हाला स्मरण करून देण्यात येते की स्वातंत्र्य पवित्र आहे. स्वातंत्र्यदिन सोहळाही खूप आवडला. समूहगीते गातांना माझे मन भरून आले. देशासाठी काहीतरी करावे, अशी इच्छा माझा मनात दाटून आली.

Explanation:

hope it's help for you..

Similar questions