History, asked by sarangbpansare4024, 1 month ago

वृत्तपत्रांचा इतिहास लेखनासाठीचा उपयोग सांगा.​

Answers

Answered by samira6732
7

Answer:

वृत्तपत्र या लेखात मुख्य शब्द वृत्त असा असला तरी केवळ वृत्त देणे एवढाच वृत्तपत्राचा आवाका नाही. वृत्तपत्रे ही वाचकांच्या जीवनाशी,विचारांशी,ध्येयवादाशी त्यांच्या सामान्य गरजा,त्यांचे प्रश्न त्यांवरील अन्याय,त्यांचे अभिमान,त्यांचे आनंद आणि दु:ख ही अशा वेगवेगळ्या प्रसंगाशी समरस झालेली असते. इ.स. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले दर्पण हे मराठी पत्रकारितेची गंगोत्री समजली जाते. वृत्तपत्रे ही अनेक पानांमध्ये प्रकाशित होत असतात. काही वृत्तपत्रे ही दररोज प्रकशित असतात, त्यांना दैनिके म्हणतात. काही वृत्तपत्रे ही आठवड्याला प्रकाशित होत असतात, त्यांना साप्ताहिक असे म्हणतात. काही वृत्तपत्रे ही पंधरा दिवसांनी प्रकाशित होत असतात त्यांना पाक्षिक असे म्हणतात. तर काही वृत्तपत्रे ही दर महिन्याला प्रकाशित होत असतात, त्यांना मासिक असे म्हणतात. काही वृत्तपत्रे दर तीन महिन्याला प्रकाशित होतात त्यांना त्रिमासिक असे म्हणतात. तर काही वृत्तपत्र ही दर सहा महिन्याला प्रकाशित होत असतात, त्याला सहामाही असे म्हणतात. तर दर वर्षी प्रकाशित होत असलेल्या वृत्तपत्राला वार्षिक असे म्हणतात. वृत्तपत्रांमधून आपल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी,राजकारण,साहित्य,कला,क्रीडा,आणि सांस्कृतिक घडामोडी समजतात.वृत्तपत्रांद्वारे आपल्याला जगात कुठे काय घडले ते समजते.

Similar questions