) वृत्तपत्रे व नियतकालिके यांतील फरक स्पष्ट करा.
Answers
Explanation:
वृत्तपत्रे दररोज प्रकाशित करण्यात येतात
व
नियतकालिके ठरलेल्या वेळी प्रसिद्ध होतात.
plz mark as brainliest
Answer:
वृत्तपत्रे व नियतकालिके माहितीचा प्रसार करण्याचे काम करतात.
Explanation:
वृत्तपत्रे:
१. वृत्तपत्रे ही चालू घडामोडींचा ऐतिहासिक दस्तऐवज असतो.
२. वृत्तपत्रांत बातम्या, लेख, स्तंभालेख, अग्रलेख इत्यादींना महत्त्व असते.
३. वृत्तपत्रे दररोज प्रसिद्ध होतात. त्यामुळे, त्यांना 'दैनिक' असेही म्हटले जाते.
४. स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या बातम्या ताबडतोब देण्याचे काम वृत्तपत्रे करत असतात.
५. वृत्तपत्रे एखाद्या विशिष्ट विषयानुसार नसतात. समाजात घडणाऱ्या सर्व घटना व तथ्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य वृत्तपत्रे करतात.
६. वृत्तपत्रांचे महत्त्व त्या त्या काळानुसार असते. लोकमत घडवणे, जागृती करणे आणि शासनव्यवस्थेवर नजर ठेवणे हे वृत्तपत्रांचे हेतू असतात.
नियतकालिके:
१. नियतकालिकांमध्ये ताज्या बातम्यांना महत्त्व नसते.
२. नियतकालिके विशिष्ट विषयांना प्राधान्य देऊन त्यावर लेख प्रसिद्ध करतात.
३. प्रकाशनाच्या कालावधीवरून नियतकालिकांचे काही प्रकार पडतात. जसे, साप्ताहिक ( सात दिवसांना प्रसिद्ध होणारे ), पाक्षिक ( पंधरा दिवसांना प्रसिद्ध होणारे ), मासिक ( महिन्याला प्रसिद्ध होणारे ), वार्षिक ( वर्षाला प्रसिद्ध होणारे ).
४. बातम्या न पुरवता मनोरंजक व ज्ञानवर्धक मजकूर पुरवणे, हा नियतकालिकाचा हेतू असतो.
५. नियतकालिके विशिष्ट विषयाला अनुसरून तयार केली जातात. भाषाशैली, लेखनपद्धती व बाह्यस्वरूप ( मुखपृष्ठ व मलपृष्ठ ) या दृष्टीने नियतकालिके वृत्तपत्रांपेक्षा वेगळी असतात.
६. विविध विषयांची सखोल व सत्य माहिती नियतकालिकांमधून मिळते. म्हणून, नियतकालिके अभ्यासाची, संशोधनाची व इतिहासाची साधने मानली जातात.