वुतजाळीची आकृती काढा
Answers
Answer:
सूर्यकुलातील एक ग्रह. अंतराच्या दृष्टीने हा सूर्यापासून तिसरा म्हणजे शुक्र व मंगळ या ग्रहांच्या मधे असून आकारमानाने सूर्यकुलातील पाचवा ग्रह आहे. सध्याच्या माहितीनुसार जीवसृष्टी धारण करणारा सूर्यकुलातील हा एकमेव ग्रह आहे. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी परप्रकाशित असून तिच्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन होऊन ती निळसर छटेने चकाकते. चंद्राशी तुलना करता पृथ्वी आकारमानाने मोठी आणि अधिक चांगली परावर्तक असल्याने तिचे पूर्णबिंब चंद्राच्या पूर्णबिंबाच्या ४० ते ५० पटींनी अधिक तेजस्वी दिसते.
पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश कधीकधी चंद्राच्या छायांकित भागात दिसतो, त्याला भूप्रकाश म्हणतात. पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र असून नैसर्गिक उपग्रह असलेल्या ग्रहांपैकी पृथ्वी हा सूर्याच्या सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. चंद्राशिवाय मानवनिर्मित अनेक कृत्रिम उपग्रहही पृथ्वीभोवती फिरत आहेत पृथ्वीभोवती सु. ६०० ते ८०० किमी. उंचीपर्यंत हवेचे आवरण म्हणजे वातावरण असून त्यापुढे ते हळूहळू आंतरग्रहीय वायूशी एकजीव होऊन जाते. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्यापासून ठराविक अतंरावर राहून त्याच्याभोवती फिरत राहते.
पृथ्वीविज्ञान
पृथ्वीविषयीचा अभ्यास भागश: होत आला आहे. पृथ्वीचा आकार व आकारमान यांचा अभ्यास करणारे भूगणित हे शास्त्र जमिनीचे सर्वेक्षण आणि भूमितीय मापन तंत्रे यांतून विकसित झाले आहे, तर भूमिस्वरूपांच्या साध्या अध्ययनातून भूविज्ञान हे शास्त्र प्रगत होत गेले आहे. भौतिकीच्या तंत्रांचा पृथ्वीच्या अभ्यासात वापर करणारे भूभौतिकी हे शास्त्र भूचुंबकत्व व गुरुत्वाकर्षण यांच्या अचूक सिद्धांतांतून उदयास आले आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून नवनव्या शास्त्रीय उपकरणांचा विकास झाल्यामुळे आणि जहाजे, विमाने, कृत्रिम उपग्रह इत्यादींमधील अशा उपकरणांच्या वापरामुळे पृथ्वीच्या अध्ययनात येणाऱ्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत आणि पृथ्वीसंबंधी बरीच नवीन व अचूक माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. उदा., वातावरण व महासागर यांचे आता प्रत्यक्ष अध्ययन होऊ लागले आहे.
भूरसायनशास्त्रातील संशोधनाने पृथ्वीसंबंधी माहिती मिळविण्यास बरीच मदत होत आहे. उच्च दाब व उच्च तापमान अशा स्थितीत खडकांवर प्रयोग करण्यात येत असून त्यांच्याद्वारे व भूकंप तरंगांच्या अभ्यासाद्वारे पृथ्वीच्या अंतरंगाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. खडकांतील जीवाश्मांच्या (जीवांच्या शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) अध्ययनावरून भूवैज्ञानिक गतकाळात जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) कसे होते. भूपृष्ठावर जमीन व पाणी यांची वाटणी कशी झालेली होती वगैरेंसंबंधी, तसेच जीवांच्या क्रमविकासाविषयी व खडकांच्या सापेक्ष वयांबद्दल माहिती मिळू शकते.
आता खडकांतील किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) पदार्थांच्या व भूचुंबकत्वाच्या अभ्यासाद्वारे बऱ्याच अचूक प्रमाणात निरपेक्ष कालमापन करता येऊ लागले आहे. पृथ्वीसंबंधीच्या अशा प्रकारच्या विविध शास्त्रांमधील संशोधनांचा एकत्रितपणे विचार करुन संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र (पृथ्वीविज्ञान) आता उदयास येत आहे. काहींनी या शास्त्राला ‘जिओसायन्स’, ‘जिओनॉमी’ अशीही नावे सुचविली आहेत.
‘मानवाचे निवासस्थान’ या दृष्टीने पृथ्वीचा अभ्यास भूगोल या विषयात केला जातो. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विशेषतः मानवाशी निगडित असलेल्या सर्व नैसर्गिक व मानवनिर्मित वैशिष्ट्यांमध्ये व आविष्कारांमध्ये स्थानपरत्वे होणाऱ्या बदलांचे वर्णन व विश्लेषण भूगोलात केले जाते. अशा विस्तृत व्याप्तीमुळे भूगोलामध्ये भौतिक व सामाजिक अशा दोन्ही प्रकारच्या जवळजवळ सर्व विज्ञानामधील माहितीचा व पद्धतींचा उपयोग करण्यात येतो. उदा., प्राणिभूगोल, वनस्पतिभूगोल, मानवजाति-भूगोल इत्यादी. इतिहासामध्ये ज्याप्रमाणे काळाला त्याप्रमाणे भूगोलामध्ये स्थानाला महत्त्व असल्याने नकाशा हे भूगोलाचे प्रमुख अभ्याससाधन