वातमी लेखन
तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या शिक्षक
दिनाची बातमी तयार करा.
Answers
६ सप्टेंबर २०१९, मंगळवार:
काल राज्यभर ५ सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. देशातल्या विविध शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील आनंदराव पवार शाळेच्या पटांगणात माननीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पार पडले. गाणी, भाषण, मार्च पास आणि सांस्कृतीक कार्यक्रमाने उपस्थितांची मनं झिंकून घेतली. अध्यक्षीय भाषणात शिक्षण मंत्र्यांनी मुलांच्या गुणवत्तेचं कौतूक करून पुढील शिक्षणाच्या योजना स्पष्ट केल्या. त्या नंतर शाळेतल्या शिक्षकांनी एक नाटक सादर केले जे खूप मनोरंजन करणारे होते.
समुहगाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Answer:
रविवार, ०६ सप्टेंबर २०२०.
सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशू विहार मराठी माध्यम (your school name) येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे वसंत सालगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्षा अॅड. स्वप्ना सातपूरकर, संस्थेचे कोषाध्यक्ष शीतल देशपांडे हे उपस्थित होते. वृषाली खांडबहाले यांनी मुलांना खुमासदार शैलीत राजू नावाच्या मुलाची गोष्ट सांगितली. विभाग प्रमुख वैशाली कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाने व शिक्षक प्रतिनिधी प्राजक्ता देशपांडे तसेच पालक शिक्षक संघाचे सदस्य यांचे सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यंदा शिक्षण ऑनलाइन सुरू असल्यामुळे या विशेष दिवसावर देखील करोनाचे सावट आहे. पण तरीही शासनाने हा दिवस कसा साजरा करता येईल, याबाबतची रुपरेषा जारी केली आहे. त्यानुसार, ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी राज्य शासनाने एक अभियान राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानांतर्गत आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दलच्या भावना व्यक्त करायच्या आहेत.
शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा झाला।।
- -