वितरणाचे नकाशे म्हणजे काय?
Answers
Answer:
तुम्ही मागील इयत्तां मध्ये परिसर अभ्यास व भूगोल विषयात जिल्हा, राज्य व देशांच्या नकाशांचा अभ्यास केला आहे. नकाशांचा उद्देश प्रामुख्याने ठिकाणाचे स्थान व चलांचे वितरण दाखवणे हा असतो . काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात. त्यांना उद्देशात्मक नकाशे असे संबोधतात. अशा नकाशांद्वारे विविध घटकांचे प्रदेशातील वितरण दाखवले जाते. एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादींचे वितरण त्या घटकांच्या आकडेवारीनुसार नकाशात दाखवले जाते.
या नकाशांचा उपयोग प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो. अशा नकाशांतून घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध चटकन लक्षात येतो. वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची सांख्यिकीय माहिती आवश्यक असते. नकाशांमध्ये हे वितरण खालील तीन प्रकारे दाखवता येते.
Explanation:
hope it helps
Answer:
it is your answer
find in paragraph