Geography, asked by sahilgite24, 1 month ago

वितरणाच्या नकाशाचे उपयोग व प्रकार लिहा​

Answers

Answered by tilochna766013
3

Explanation:

i hope you may like my answer ☺️

Attachments:
Answered by Kuku01
2

Explanation:

कारण :- वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश एखाद्या घटकाचे प्रदेशातील वितरण दाखवणे हा असतो.

(आ) क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.

उत्तर :- योग्य

क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मुल्ये विचारात घेतात. त्यानंतर त्यांचे साधारणत: ५ ते ७ गटांत वर्गीकरण करतात व त्यानुसार संपूर्ण उपविभागासाठी संबंधित मूल्यवर्ग ग्राह्य धरले जाते. अशाप्रकारे क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.

(इ) क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत.

उत्तर :- अयोग्य

कारण :- क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मुल्ये विचारात घेतात. त्यानंतर त्यांचे साधारणतः ५ ते ७ गटांत वगीकरण करतात. प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात. ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्यगटानुसार नकाशावर काढले जातात. म्हणजेच | क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात घटकांच्या मुल्याप्रमाणे छटा बदलत जातात.

(ई) क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.

उत्तर :- अयोग्य

ज्या चलांचे वितरण विलग असते, अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी क्षेत्रघनी नकाशा वापरतात. ज्या चलांचे वितरण सलग असते, अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात. उंची या चलाचे वितरण सलग असते. त्यामुळे उंची दाखवण्यासाठी क्षेत्रघनी नकाशाऐवजी समघनी नकाशा वापरतात.

(उ) लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.

उत्तर :- अयोग्य

करण :- लोकसंख्या या चलाचे वितरण सलग नसते. त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा न वापरता टिंब नकाशा किंवा क्षेत्रघनी नकाशाचा वापर करतात.

(ऊ) टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे.

उत्तर :- योग्य

कारण :- मुक्तपणे विखुरलेल्या घटकांचे वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धतीचा नकाशा वापरतात. टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये घटकाच्या मूल्यानुसार प्रत्येक टिंबाच्या आकाराचे प्रमाण ठरवले जाते. म्हणूनच टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे.

(ए) समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत.

उत्तर :- अयोग्य

कारण :- जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. उदा. उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. सममूल्य असणारी ठिकाणे एका रेषेने जोडून ही नकाशे तयार केली जातात. अशा प्रकारे समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार केली जातात.

(ऐ) टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते.

उत्तर :- योग्य

कारण :- सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो. टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशामध्ये टिंबे देऊन घटक वितरित झाला आहे तशाच त-हेने नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवले जाते. म्हणूनच टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते.

प्रश्न २ ला : थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा.

वितरणाच्या नकाशाचे उपयोग :-

वितरणाच्या नकाशाचा उपयोग एकाद्या घटकांचे एखाद्या प्रदेशातील वितरण दाखवणे हा आहे.

वितरणाच्या नकाशांचे प्रकार

Similar questions