History, asked by madhukarbagul93, 1 month ago

वैदिक काळात किती वर्ण अस्तित्वात होते​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

चार

Explanation:

वैदिक काळात ब्राह्मण, शूद्र, क्षत्रिय, वैश्य, हे वर्ण अस्तित्वात होते. व्यवसायावरून त्यांचे वर्ण ठरवण्यात आले होते.

वैदिक काळातील लोक निसर्ग पूजा करीत असत. त्या काळातील लोक हे दूध व दुधापासून बनवलेले पदार्थ खात होते त्याच बरोबर धान्य, मांस, फळे, यांचादेखील आहारात वापर करत असत.

वैदिक काळातील लोक हे सुती कपड्यांचा व लोकरांचा वापर करत होते. हे लोक सोन्याचे दागिने, फुलांच्या माळा, परिधान करत असत. त्या काळातील लोक हे झोपडी व मातीच्या घरात राहत असे. वैदिक काळातील राज्यव्यवस्था ही ग्रामीण स्वरूपाची होती.

Answered by singhrangareashi
0

Answer:

त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते

वैदिक संस्कृतीची वैशिष्टे :

   आर्य हे शस्त्रधारक असून त्यांनी टोळ्यांच्या रूपाने भारतात प्रवेश केला.

   गुरे ही त्यांची प्रमुख संपत्ती होती. गुरांना आवश्यक असलेली कुरणे आणि पाण्याची   सोईमुळे हे लोक सप्तसिंधुच्या खोर्‍यात स्थायिक झाले.

   हे टोळ्याच्या रूपाने राहत असे आणि आपआपसात लढाया करीत असे. यापैकी भरत नावाची टोळी सर्वात पराक्रमी होती. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले.

   सप्तसिंधुचा प्रदेश अपूर्ण पडल्यामुळे, यापैकी काही टोळ्या लोक गंगा-यमुनेच्या खोर्‍यात सरकल्या. व त्यांनी त्या भागात वस्ती केली. या प्रदेशाला आर्यवर्त असे नांव पडले.

वैदिक वाड्मयाची रचना :

   आर्य लोक निसर्गप्रेमी आणि अनेक देव-देवतांचे पूजक होते.

   सूर्य, अग्नी, पर्जन्य, मरुत आणि इंद्र या त्यांच्या प्रमुख देवता होत्या. या देवतांना प्रत्यांना प्रसन्न करण्यासाठी ते प्रार्थना करीत व स्तुति करण्याकरीता मंत्र म्हणीत असे.

   या मंत्राना सूक्त म्हणतात या मंत्राचा समूह म्हणजे वेद होय. यामधून आर्यांनी खालील ग्रथसंपदेची रचना केली.

   वेद : आर्यानी निर्माण केलेली पहिली ग्रंथरचना म्हणजे वेद होय. वेद चार प्रकारचे आहेत.

   ऋवेद : हा आर्यांचा पहिला ग्रंथ असून यामध्ये देवतांना प्रसन्न करण्याकरीता रचलेल्या ऋचांचा समावेश आहे.

   यजुर्वेद : हा ग्रंथ यज्ञाविषयी माहिती देणारा आहे.

   सामवेद : या ग्रंथामध्ये ऋचांचे तालासुरात कसे गायन करावे याबाबतची माहिती आहे.

   अर्थवेद : या ग्रंथामध्ये दैनंदिन जीवनातील संकटे निवारण करण्याकरीता आणि उत्तम आरोग्य कराव्या लागणार्‍या उपायाची माहिती आहे.

इतर ग्रंथसंपदा :

   ब्राम्हण्यके : यामध्ये यज्ञवेदीमध्ये वेदांचा वापर कसा करावा याबाबतची माहीती आहे.

   आरण्यके : वानप्रस्थाश्रम घेतल्यानंतर अरण्यात जावून रचलेल्या ग्रंथाचा समावेश होतो.

   उपनिषदे : उपनिषधे यांचा अर्थ गुरुजवळ बसून मिळविलेले ज्ञान होय. यामध्ये अनेक प्रश्नावर जीवनातील अनेक प्रश्नावर सखोल चिंतन करण्यात आलेले आहे.

वैदिक कालीन राज्यव्यवस्था :

   वैदिक कालीन राज्यव्यवस्था एक प्रकारे ग्रामीण व्यवस्थेची होती.

   राजा : राजा हा राज्याचा प्रमुख असून प्रजेचे रक्षण करणे ही त्याची प्रमुख जबाबदारी असे. राज्याचा कारभार चालविण्याकरीता त्यास पूरोहित, सेनापती आणि कर गोळा करणारा  भागदुध मदत करीत असे.

   सभा व समिती : राज्य सत्तेवर नियंत्रण ठेवण्याकरिता सभा व समिती अशा दोन संस्था होत्या.

   सभा : ही ज्येष्ठ लोकांचे मंडळ होते.

   समिती : लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती म्हटले जात असे.

इतर शासन व्यवस्था :

   ग्रामणी : गावाच्या प्रमुखास ग्रामणी असे म्हटले जात असे व ग्रामवादी हा ग्रामणीच्या मदतीने गावाची न्यायविषयक जाबबदारी सांभाळत असे.

   विशपती : गावाच्या समूहाला विश आणि त्याच्या प्रमुखास विश्पती म्हटले जात असे.

दैनंदिन जिवनप्रणाली :

   अन्न : वैदिक काळातील लोकांच्या आहारात दूध व दुधापासून बनलेल्या पदार्थाचा वापर असे. त्याचबरोबर मांस, फळे, तांदूळ आणि सातू इत्यादी धान्याचा उपयोग होत असे.

   वस्त्र व प्रावरणे : वैदिक काळातील लोक स्तुती आणि लोकरीच्या कापडाचा वापर करीत असे.

   घरे : वैदिक संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. आर्य लोक झोपडी वजा मातीच्या घरात राहत असे.

   अलंकार : वैदिक काळातील लोक फुलांच्या माळा, सोन्याचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे मणी व त्यांच्या माळा अलंकार म्हणून वापरीत असे. निष्क हा त्यांचा आवडता दागिना होता.

वैदिक कालीन सामाजिक व्यवस्था :

   वर्णव्यवस्था : वर्णव्यवस्था ही भारतीय जाती व्यवस्थेचा उगमस्थान आहे. सुरुवातीच्या काळात व्यवसायावरून ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शूद्र असे वर्ण निर्माण झाले. उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था संपुष्टात येवून जन्मावरून जात ठरू लागली.

   कुटुंबव्यवस्था : भारतात पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचा जन्म वैदिक काळामध्ये झाला. समाजव्यवस्थेत स्त्रीयांचे स्थान दुय्यम असले तरी स्त्रियांना वेदाभ्यास करण्याचा अधिकार होता. गार्गी, लोपमुद्रा व मेत्रेयी या विद्वान स्त्रियांचा उल्लेख वैदिक काळातील वाड्मयात आढळतो. नंतरच्या काळात स्त्रियांवर कडक बंधने लादली गेली.

   आश्रमव्यवस्था : जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या काळात मानवाला जीवनाचे शंभर वर्षे आयुष्य कल्पून त्याचे चार भागात विभाजन करण्यात आले. या प्रत्येक भागाला खालीलप्रमाणे कर्तव्य सोपविण्यात आले. ही जीवनाची आखणी म्हणजे आश्रमव्यवस्था होय.

   ब्रम्हचर्याश्रम : आयुष्याच्या पहिल्या भागात व्यक्तीकडे गुरुच्या सानिध्यात अभ्यास करून ज्ञान ग्रहण करून विद्या संपादन करण्याचे कर्तव्य त्याच्यावर सोपविण्यात आले.

   गृहस्थाश्रम : या काळात व्यक्तीने विवाह करून त्याचेकडे कुटुंबाचे पालन व पोषण करण्याची आणि आपली संसारीक जाबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य त्याच्यावर सोपविण्यात आले आहे.

   वानप्रस्थाश्रम : या काळात व्यक्तीने आपल्या मुलांकडे जबाबदारी सोपवून संसाराच्या सर्व कर्तव्यातून मुक्त होणे म्हणजे वानप्रस्थाश्रम होय.

   संन्यासाश्रम : यात व्यक्तीने वनात जावून ईश्वर चिंतनात आपला उर्वरित काळ कंठावा असे मानले जाई.

धार्मिक संकल्पना :

   वैदिक काळातील लोक निसर्गपूजक होते.

   सूर्य, वारा व पानी या शक्ति प्रसन्न राहाव्यात म्हणून आर्य लोक त्यांची प्रार्थना करीत असे. अशा देवतांना नैवैद्य प्रदान करण्यात येत असे आणि हा नैवैद्य शक्तिपर्यंत पोहचविण्याचे कार्य अग्नी करतो अशी त्याची संकल्पना होती.

अग्नीस प्रसन्न करण्याकरीता यज्ञ ही संकल्पना उदयास आली.

Similar questions