विठ्ठ्ल उमप यांचे शब्दचित्र तुमच्य शब्दात रेखाटा
Answers
Answer:
विठ्ठल उमप (१५ जुलै, १९३१ - २६ नोव्हेंबर, २०१०) हे मराठी शाहीर व लोककलाकार होते.[१] उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
विठ्ठल उमप यांचा जन्म जुलै १५, इ.स. १९३१ रोजी मुंबईमधील नायगाव येथे झाला. उमप लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांमध्ये लोकगीतांमार्फत आणि पथनाट्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते. विठ्ठल उमपांनी हेच कार्य पुढे चालू ठेवले.
राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शाहिरी शिबिराचे ते चार वर्षे संचालक होते. शिवाय, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे सल्लागार, नभोवाणीचे परीक्षक अशा जबाबदाऱ्याही त्यांनी पेलल्या होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाशीही ते संबंधित होते.
उमप यांचा नोव्हेंबर २०१० मध्ये दीक्षाभूमी नागपूर येथे लॉर्ड बुद्धा टीव्ही या दूरचित्रवाणीवरील आयोजित कार्यक्रमादरम्यान हृदययक्रिया बंद पडून झाला.