Hindi, asked by shindetanaji783, 5 months ago

विद्येचे महत्त्व लिहा मराठी​

Answers

Answered by MSMAHI07
0

Answer:

विद्यार्थीदशेत आपला बहुतेक वेळ शाळा आणि शिक्षण यांच्याशी निगडित असतो. शाळा हे विद्येचे मंदिर आहे, तसेच ते संस्काराचे एक महत्त्वाचे माध्यम आहे; म्हणूनच या कालावधीत मुलांनी प्रत्येक गोष्ट समजून, नीटपणे केल्यास त्यांच्या पुढील जीवनात एकप्रकारची शिस्त येऊन ते आदर्श बनेल !

शाळेतील वर्तन असे असावे !

१. सायकल ओळीत (रांगेत) लावावी आणि वर्गात जाऊन दप्तर ठेवावे.

२. शाळेच्या पटांगणात प्रार्थनेसाठी एकत्र जमतांना वर्गातून ओळीने (रांगेने) यावे आणि ओळीतच उभे रहावे. प्रार्थना झाल्यावर पुन्हा वर्गात ओळीनेच जावे.

३. वर्गात गेल्यावर वास्तूदेवता, स्थानदेवता, तसेच विद्येच्या देवता श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांना मनोमन वंदन करून ‘तुमच्या कृपेने मला या वास्तूत ज्ञान ग्रहण करण्याची संधी मिळाली आहे. आज शिकवल्या जाणार्‍या सर्व विषयांचे ज्ञान मला एकाग्रतेने ग्रहण करता येऊ दे’, अशी प्रार्थना करावी.

४. प्रत्येक विषयाच्या तासिकेला (period) आरंभ होतांना कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांना प्रार्थना करावी, ‘शिक्षकांमध्ये मला तुझे रूप दिसू दे आणि आता वर्गात शिक्षक जे काही शिकवणार आहेत, ते मला नीट कळू दे.’

Similar questions