विद्युल्लता समासाचे नाव
Answers
Answer:
दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दर्शविणाऱ्या प्रत्ययांचा किंवा अव्ययांचा लोप होऊन जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात.जोडशब्द बनविण्याची अथवा एकत्रीकरणाची ही जी प्रक्रिया आहे तिला समास म्हणतात. पाणिनी व भाष्यकार पतंजलिने समासाचे चार प्रकार सांगितले आहेत –अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीहि.सिद्धान्तकौमुदीत भट्टोजी दीक्षितांनी सुद्धा हेच प्रकार सांगून त्यांच्या उपप्रकारांचा निर्देश केला आहे. उत्तरकालीन परंपरेने समासाचे सहा प्रकार मानले आहेत – अव्ययीभाव,तत्पुरुष, द्वंद्व, द्विगु, बहुव्रीही, कर्मधारय.
(१) अव्ययीभाव – यात अव्यय हे प्रधान असून सामान्यतः पूर्वनिपाताने ते समासात पहिल्या स्थानी येते. म्हणून हा समास पूर्वपदप्रधान असतो. संपूर्ण सामासिकशब्द हा व्याकरणदृष्ट्या अव्यय म्हणूनच राहत असल्याने त्याला अव्ययीभाव अशी संज्ञा आहे. हा समास एकवचनी व नपुंसकलिंगी असतो. उदा. क्रमम् अनुसृत्य – यथाक्रमम् । दिने दिने – प्रतिदिनम् ।,घरोघर,दररोज,यथाक्रम.