विद्यार्थी जीवन speech in Marathi
Answers
I know marathi
But i am not having answer in marathi so i snd u in Hindi
शुभ प्रभात. उपस्तीत असलेल्या मान्यवरांना आणि माझा श्रोतगणांना माझा नमस्कार. मी आज विद्यार्थी जीवन ह्या विषयावर दोन शब्द बोलणार आहे.
विद्यार्थी जीवन एका व्यक्तीच्या जीवन काळात खूप महत्त्वाचा भाग असतो. माणूस आयुष्यभर शिकत असतो. कधी शाळा शिकवते तर कधी अनुभव शिकवतात. म्हणून माणूस तसा जीवन भर विद्यार्थी आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
तरी विशिष्ट विद्यार्थी जीवनाबद्दल बोलायचं झालं, तर विद्यार्थी जीवन आपल्याला साक्षर बनवतो. ह्याच काळात आपण बरोबर आणि चूक ह्यातील अंतर शिकतो. ह्या काळात आपल्याला शिक्षकांच्या रूपात मार्गदर्शक मिळतात. आपण कोणत्याही गोष्टीत अडलो, तर ते आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात.
विद्यार्थी जीवनात आपल्याला गुरुजनांकाढून विद्या प्राप्त होते. ती विद्या अपल्याय भावी आयुष्यात कामी येते. गुरुजन आपल्याला शिस्त लावतात. कुठे कसे वागायचे ही शिस्त लावतात. आणि त्यामुळे आपले एक व्यक्तिमत्व निर्माण होते. शिक्षक पिढीला आकार देतात हे असेच थोडी म्हंटले आहे! शिक्षरचे कार्य थोर आहे के खरं!
सगळ्याचा सारांश इतकाच, कि विद्यार्थी जीवन माणसाचा आयुष्यातला एक मोठा अणि अविभाज्य भाग आहे.
धन्यवाद.