India Languages, asked by charulpatil26, 11 months ago

विद्यार्थी खरंच बेशिस्त होत आहे का ?
need fast answer in marathi plzzzzzz​

Answers

Answered by kiran12355
1

Answer:

हो खरच काही काही विद्यार्थी बेशिस्त बेफिकीर वागत आहेत. गुरूजींच्या आज्ञा पाळणे मुलांना योग्य वाटत नाही. बरेच मुले गुरूजींच्या मागे त्यांना वाटेल तसे बोलताना दिसतात हे खरच चुकीचे आहे.

Answered by Anonymous
4

Answer:

एकदा माझ्याकडे माझे मित्र आले होते. आमच्या जोरजोरात गप्पा झाल्या. जाताना सर्वजण जिन्यावरून उड्या मारत आरडाओरड करत खाली गेले. ते गेल्यावर शेजारचे काका मला म्हणाले, "असे कसे रे तुम्ही विदयार्थी? तुम्हांला जराही शिस्त कशी नाही? कसे बोलता? किती आरडाओरडा करता!" शेजारचे काका आज मला हे म्हणाले खरे. पण हेच शब्द मी अनेकदा अनेकांकडून ऐकले आहेत. माझ्या मनात आले की, आम्हां विदयार्थ्यांबद्दल सतत असे का बोलले जाते? मी त्या दिवशी खूप विचार केला. मला हळूहळू स्पष्ट होऊ लागले. सगळ्यांचे म्हणणे एकच होते - हल्लीच्या विदयार्थ्यांना मुळी शिस्त अशी नाहीच. आईवडील, शिक्षक, मोठी माणसे यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदरच नाही. सार्वजनिक ठिकाणी ते बेदरकारपणे वागतात. त्यांच्या बोलण्यात उद्धटपणा असतो. या विदयार्थ्यांना फक्त मौजमजा करायला हवी. टी. व्ही. सिनेमे पाहायला हवेत. मनापासून अभ्यास करायला नको. वरवर पाहिले तर हे म्हणणे खरे आहे, असे वाटू लागते. पण मला मनातून हे पटतच नाही. खरोखर आजचा विदयार्थी बेशिस्त आहे का? शिस्त म्हणजे काय? रांगेने येणे, रांगेने जाणे म्हणजे शिस्त? सतत सर्वांसमोर खाली मान घालून उभे राहणे म्हणजे शिस्त का?

पूर्वी खरोखर विदयार्थी असेच वागत का? कधी कधी आईबाबा त्यांच्या शाळेतल्या गमती सांगतात. या गमती आमच्यासारख्याच होत्या, हे लक्षात येते. मग मोठ्या माणसांना आमच्यातच दोष का दिसतो?

थोडा विचार केल्यावर माझ्या लक्षात आले की, पूर्वी प्रत्येक घरात फक्त वडील कमावणारे. घरातले निर्णय तेच घेत. सर्व काही त्यांच्याच मताप्रमाणे चाले. त्यामुळे घराघरांत फक्त वडिलांचाच दरारा असे. साहजिकच त्यांना बिचकूनच सर्व राहत. यालाच शिस्त म्हणायची का?आजच्या विदयार्थ्याला यामुळे आत्मविश्वास वाटतो. तो ठामपणे मोठ्या माणसांशी बोलू शकतो. हे कदाचित मोठ्या माणसांना बेशिस्तीसारखे वाटत असावे. ज्यांना ज्ञान जास्त आहे, अशा मोठ्या माणसांबद्दल आम्हांला खूप आदर वाटतो. केवळ वयाने मोठे म्हणूनच आदर दाखवावा, त्यांचे सगळे म्हणणे मान्य करावे, असे कसे होईल? मला वाटते मोठ्या माणसांनीच उदारपणाने ही बदललेली स्थिती समजून घ्यावी मला तर आजचा विदयार्थी बेशिस्त आहे, असे अजिबात वाटत नाही.

Similar questions