विद्यार्थ्यांची मनोगते
दि. २० फेब्रुवारी
दुपारी ४ वाजता
इयत्ता १०वी-
निरोप समारंभ
शालेय आठवणींना
ज्ञानसंवर्धन विद्यालय,
अमरावती
उजाळा
शिक्षकांची मनोगते
Answers
Answer:
Explanation:
दि. 20 फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी 4 वाजता आमच्या ज्ञानसंवर्धन विद्यालयाचा 10वी च निरोप समारंभ होता. मी बरोबर 4 वाजता शाळेच्या हॉलवर हजर झाले. शाळेचा हॉल फुळे व फलकांनी सुंदर सजवला होता. मुख्याध्यापक व शिक्षक ज्या टेबलापाशी बसणार होते ते टेबल सुंदर फुलदाण्यांनी सजवले होते.
समारंभाला दुपारी 4 वाजता सुरुवात झाली. दहावीच्या समीर पाटील याने भावपूर्ण निरोपाचे भाषण दिले. ज्यामध्ये त्याने शाळेबरोबर तसेच त्याच्या वर्गाबरोबर, मित्रांबरोबर असलेले संबंध नमूद केले शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापिका व शाळेतील सर्व कर्मचारीचे मनपूर्वक आभार मानले.
त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी रविंद्र चव्हाण याने सुंदर भाषण करून गुरूबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्याने शाळा व शिक्षक यांचा आम्हां विद्यार्थ्याच्या व्यक्तिमहत्त्वात कसा बदल होता गेला याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्याच्या बोलण्याने आम्ही विद्यार्थी भावूक झालो; पण त्याने लगेचच विनोद निर्माण करून वातावरण हास्य बनवले
मुख्याध्यापिकानी आपल्या भाषणात भावी आयुष्यात वाटचाल काशी करावी यांचे मार्गदर्शन केले. देशभक्ती आणि राष्ट्रिमतेची भावना अंगी बाणवण्यावर जोर दिला. शेवटी वर्गशिक्षिका सौ. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यानी केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. आम्हांला पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर साधारण एक तास आम्ही सर्व मित्र मैत्रिणी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. शाळेतील 1ली पासून ते 10पर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षक व शाळेतील सर्व मित्र-मैत्रिणी सोंबत सेल्फी काढले.
उद्या पासून मी विभक्त होणार होतो या भावनेने मी दुःखी झालो होतो माझ्यासाठी, ती केवळ एक ज्ञान देणारी शाळा नव्हती तर संस्कृती व सभ्यतेचे उगमस्थान होते. सर्व शिक्षकांचे आशिर्वाद घेतले. मित्रांना शुभेच्छा दिल्या. आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी घेऊन मी जड अंतःकरनाणे शाळेच्या निरोप घेतला पण जेव्हा कधी शाळेची आठवण झाली की मी शाळेला नक्की भेट देईन.