विद्यार्धिनी विद्यालय, गोरेगाव, विद्यार्थी प्रमुख या नात्याने कार्यशाळा तुमच्या विद्यालयात आयोजित करण्याची मागणी करणारे पत्र लिहा.
Answers
पत्र लेखन
Explanation:
परेश जोशी,
विद्यार्धिनी विद्यालय,
गोरेगाव.
दिनांक : २७ ऑक्टोबर, २०२१
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
विद्यार्धिनी विद्यालय,
गोरेगाव.
विषय: शाळेत कार्यशाळा आयोजित करण्याबाबत.
महोदय,
मी, परेश जोशी, आपल्या शाळेत इयत्ता दहावी- ब मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. शाळेचा विद्यार्थी प्रमुख म्हणून मी हे पत्र लिहत आहे. पत्र याकरिता लिहत आहे की दरवर्षी आपल्या शाळेत आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळा आयोजित करतो.
त्याचप्रकारे मी तुम्हाला विनंती करतो की यावर्षी आपल्या शाळेत गणपती मूर्ती घडविण्याची कार्यशाळेचे आयोजन केले तर खूप उत्तम होईल. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती घडविण्याचे मोफत प्रशिक्षण मिळेल.
मला खात्री आहे की या कार्यशाळेत मोठ्या संख्येत विद्यार्थी सहभागी होतील. म्हणून, मी नम्र विनंती करतो की आपण या कार्यशाळेचे आयोजन आपल्या शाळेत करावे.
धन्यावाद.
आपला आज्ञाधारी विद्यार्थी,
परेश जोशी,
इयत्ता दहावी- ब.
(विद्यार्थी प्रतिनिधी)